केज तहसीलदार यांच्या मध्यस्थीने भाई मोहन गुंड यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित !
केज : केज तहसीलदार राकेश गिड्डे यांनी गेली सहा दिवस सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनास भेट देऊन महत्वाच्या मुद्यावर चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर सहाव्या दिवशी भाई मोहन गुंड यांनी आपले आंदोलन पंधरा दिवस स्थगित करून तहसीलदार यांच्या हस्ते उपोषण सोडले. केज शहरातील घरकुल घोटाळा व इतर महत्वपूर्ण मागण्या घेवून शेकाप च्या वतीने 27 मार्च पासून केज नगरपंच्यायतसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले होते. आंदोलनास केजच्या केज विकास संघर्ष समितीसह, शिवसेना (शिंदे गट) रिपाई (आठवले गट ), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, त संभाजी ब्रिगेड, टू व्हीलर्स असोसिएशन यासह इतर राजकीय सामाजिक संघटनानी पाठिंबा देऊन आंदोलनाची तीव्रता वाढवली होती. बुधवारी सकाळी रस्ता रोको नंतर आंदोलकांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. बुधवारी सायंकाळी सात वाजता केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी उपोषण स्थळास भेट देऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी दीपक वाजळे यांच्याशी आंदोलन कर्त्याशी भ्रमण ध्वनीवर संवाद साधून दिला. यावेळी त्यांनी सर्व दोषीवर गुन्हें दाखल करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच महत्वाच्या मुद्द्यावर बीड जिल्हाधिकारी यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक लावण्याचे आश्वासन दिले. केज नगरपंच्यायत अंतर्गत सर्व मागण्या येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचेही त्यांनी आश्वादान दिल्यानंतर हे आंदोलन पंधरा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार यांनी मध्यस्थी करून उपोषणाची दखल घेतल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी प्रशासनाचे आभार मानले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हनुमंत भोसले, बीड जिल्हा चिटणीस भाई ऍड नारायणराव गोले पाटील, कपिल मस्के भाई अशोक रोडे, ऍड निखिल बचूटे, फिरोज पठाण, श्याम चिंचोलकर, कविराज गुंड, भाई मुंजाबा पांचाळ, नासेर मुंडे यांच्यासह नागरिकांनी सहकार्य केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.