ताज्या घडामोडी

धक्कादायक! तामिळनाडूत बीडच्या केज तालुक्यातील डोक्याच्या माजी सरपंचाला ८ लाखांच्या बनावट नोटांसह अटक.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी:

धक्कादायक! तामिळनाडूत बीडच्या केज तालुक्यातील डोक्याच्या माजी सरपंचाला ८ लाखांच्या बनावट नोटांसह तामिळनाडू अटक.

​तामिळनाडू: एकीकडे बनावट नोटांच्या रॅकेटने देशाची अर्थव्यवस्था पोखरली जात असतानाच, तामिळनाडू पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील डोका गावच्या माजी सरपंचासह केज मधील एका व्यापाऱ्याला तब्बल ८ लाख ३७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेने महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांत मोठी खळबळ माजली आहे.या खळबळजनक घटनेबाबत​मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील डोका येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे (वय ५४) आणि केज शहरातील ‘माया मशनरी’चे मालक नारायण राम पटेल (वय ३४) हे दोघे आपल्या खाजगी कारने (MH 44 Z 2383) तामिळनाडू दौऱ्यावर होते. २१ जानेवारी रोजी तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवकुडी येथे एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर त्यांनी पैसे देण्यासाठी २०० रुपयांच्या काही नोटा दिल्या. ​मात्र, पंपावरील कर्मचाऱ्याला या नोटांच्या अस्सलतेबद्दल संशय आला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून चेकपोस्टवर ही कार अडवली आणि झडती सुरू केली. ​कारमध्ये काय सापडले? ​पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारमध्ये बनावट नोटांच्या बॅगा लपवून ठेवल्या होत्या. यामध्ये: ​एकूण रक्कम: ८ लाख ३७ हजार रुपये.​ २०० रुपयांच्या नोटांचे तब्बल ४१ बंडल.जप्त केले.बनावट नोटांसह वापरलेली कार देखील जप्त केली आहे.​तपासात मोठे खुलासे होत असल्यचे समोर येत आहे. सदरचा तपास सीबी-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. ​प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, या आरोपींनी यापूर्वी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर या भागातही मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणल्या आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तामिळनाडू सरकारने या प्रकरणाचा तपास सीबी-सीआयडी (CB-CID) कडे सोपवला आहे. ​प्रमुख प्रश्न जे आता चर्चेत आहेत ते म्हणजे ​या बनावट नोटांचे मूळ रॅकेट कुठे आहे? ​एका लोकप्रतिनिधीचा (माजी सरपंच) यात सहभाग कसा? ​या नोटा छापल्या कुठे जातात आणि याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात?​या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या ‘तामिळनाडू कनेक्शन’चे गूढ उकलण्यासाठी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये