ताज्या घडामोडी

केज तालुक्यात खळबळ! नांदुर घाट ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा निष्पन्न ; तीन दिवसांत पैसे भरण्याचे चौकशी समितीचे आदेश!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

केज तालुक्यात खळबळ! नांदुर घाट ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा निष्पन्न ; तीन दिवसांत पैसे भरण्याचे चौकशी समिती प्रशासनाचे आदेश!

​केज /प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या केज तालुक्यातील नांदूर (घाट) ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध योजनेत(नरेगा) तब्बल १ कोटी ३ लाख ८९ हजार ८० रुपयांचा मोठा भ्रष्टाचार चौकशी समितिने निष्पन्न केला असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांना तीन दिवसात भ्रष्टाचाराची रक्कम ग्रामपंचायत च्या खात्यावर भरणा करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. बीड जिल्ह्याच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वसुलीची कारवाई मानली जात असून, प्रत्यक्ष कोणतेही काम न करता संगनमताने निधी लाटणाऱ्या पाच जणांना तीन दिवसांत ही रक्कम ग्रामपंचायत कार्यालयाच्या खात्यावर भरण्याचे कडक आदेश चौकशी समिती प्रशासनाने दिले आहेत.​चौकशी समितीच्या अहवालानुसार, शासकीय निधी हडपल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी संबंधितांना वसुलीचे आदेश पत्र देण्यात आले आहेत.२६ किंवा २७ ऑगस्टपर्यंत ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न केल्यास, वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत थेट फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने वसुली केली जाणार आहे. ​कोणाकडून किती होणार वसुली? ​सुनीता युवराज जाधव (सरपंच): ₹३३,१५,१४७ ​बी. एन. शिरसाट (ग्रामसेवक): ₹२५,३६,४३४ ​सादिक दिलावर शेख (रोजगार सेवक): ₹३३,१५,१४७ ​व्ही. एस. सासवडे (शाखा अभियंता): ₹४,१५,१५३ ​आर. आर. दराडे (तांत्रिक अधिकारी, नरेगा): ₹८,०७,५९९ ​एकूण वसुली रक्कम: ₹१,०३,८९,०८० ​पैसे न भरल्यास थेट फौजदारी कारवाई – विठ्ठल नागरगोजे (गटविकास अधिकारी, केज) “नांदूर घाट ग्रामपंचायतीत अपहार झाल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या वसुली पत्रानुसार वर्गीकरण करून नोटीसा देण्यात आल्या आहेत. तीन दिवसांच्या आत ही रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करून पुढे ती वर्ग करावी लागेल. रक्कम न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई निश्चित होईल.” ​वसूलीची रक्कम गावाच्याच विकासासाठी वापरा – सौ. सोनाली अमोल जाधव (ग्रामपंचायत सदस्य) “अपहार झालेली कोट्यवधींची रक्कम शासन दरबारी जमा न करता नांदूर घाटच्या विकासासाठीच वापरली पाहिजे. हा निधी ज्या कामांसाठी आला होता, त्याच कामांवर खर्च करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून गावाचा विकास साधावा.” ​घरकुल, विहिरी आणि कर वसुलीतही गैरव्यवहाराचा संशय! हा घोटाळा केवळ रस्त्यांच्या कामापुरता मर्यादित नसून घरकुल, विहिरी आणि कर वसुलीमध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये