क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाचखोर कनिष्ठ अभियंता व पोलिस आमलदार लाच घेताना पकडले.बीड आणि जालना लाचलुचपत विभागाची कारवाई. बीड मध्ये खळबळ!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

लाचखोर कनिष्ठ अभियंता व पोलिस आमलदार लाच घेताना पकडले.बीड आणि जालना लाचलुचपत विभागाची कारवाई. बीड मध्ये खळबळ!

बीड :- बीड जिल्ह्यातल्या सर्वच प्रशासकीय विभागात लाचखोरांचे थैमान माजलेले असतानाच बीड नगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला नऊ लाखांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत विभागाने तर, पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पोलिस अंमलदार व होमगार्डला जालन्याच्या लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडल्याची कारवाई एकाच दिवशी झाल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,पिंपळनेर पोलीस ठाण्यातील रामप्रसाद शिवनाथ कडूळे (वय ३६, पोलीस अंमलदार) व ईश्वर बाबासाहेब जामकर (वय-४४ होमगार्ड) या दोघांवर वाळूचा टॅक्टर चालू देण्यासाठी व बीड नगरपालिकेतील तक्रारदार यांचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी ९ लाखांच्या लाच प्रकरणात कनिष्ठ अभियंता व खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी बीड व जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यातील रामप्रसाद शिवनाथ कडूळे (अंमलदार) व होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर या दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूचा टॅक्टर चालू देण्यासाठी ५ हजारांच्या लाच प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले. होमगार्डला ताब्यात घेण्यात आले असून रामप्रसाद कडूळे फरार आहे. जालन्याच्या पथकाने बीडमध्ये येऊन ही कारवाई केली. तर दुसरीकडे बीडच्या नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद याने बांधकाम परवान्यासाठी बारा लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९ लाख तक्रारदार यांना खाजगी इसम किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले. म्हणून दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचलुचपत विभागाच्या करवाईमुळं चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच दिवशी बीड जिल्ह्यातील पोलीस आणि नगरपालिकेतील लाचखोरांवर कारवाई झाल्यामुळे बीडमध्ये मात्र अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये