क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तांबवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कारकून तथा भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेचे सचिव आणि सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार दिलीप हरिभाऊ चाटे यांचे विरुद्ध ४२० सह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल!

पाठलाग न्युज/क्राईम प्रतिनिधि:

केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कारकून तथा भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेचे सचिव आणि सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार दिलीप हरिभाऊ चाटे यांचे विरुद्ध ४२० सह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल!

केज:शिक्षण क्षेत्रातील विविध काळ्याकुट्ट प्रकरणात गाजत असलेल्या तांबवा येथील “गणेश माध्यमिक” विद्यालयाची कधीच पायरी न शिवलेले परंतु यशस्वीपणे सेवानिवृत्त होऊन आज निवृत्तीवेतनाचा बिनबोभाट लाभ चुरत असलेले; तसेच अयुष्य भरापासून सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार असलेले आणि भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेचे सचिव म्हणून जिल्हाधिकारी यांची मान्यता नसतांना तांबवा गावठाण चे चिरकाड फस्त करणारे दिलीप हरिभाऊ चाटे यांच्या विरुद्ध तांबवा येथील एका आंध लोक कलाकारला हातोहात फसवल्या प्रकरणी कलम ४२० सह अंट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी विष्णू ओव्हाळ हे दोन्हीही डोळ्याने अंध आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीम गीते गाऊन आपली उपजीविका करतात. ओव्हाळ हे गेली अनेक दिवसांपासून तांबवा येथील गावठाण जमिनीच्या जागेवर स्वतःचे पत्र्याचे शेड मारून त्यांच्या कुटुंबासह वास्तव्य करत आहेत. परंतु , गणेश माध्यमिक विद्यालयाचे नौकरी न करताच सेवानिवृत्त झालेले कारकून आणि भगवान बाबा गृह निर्माण संस्थेचे सचिव दिलीप चाटे यांनी सदरची जागा ही माझ्या संस्थेच्या मालकीची असल्याचे म्हणत त्यांनी सदरची जागा विष्णू ओव्हाळ यांचा मुलगा आनंद विष्णू ओव्हाळ याच्या नावे रजिस्ट्री न करता शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून दिली व त्या मोबदल्यात ५० हजार रुपये घेतले. सदरची जागा दोन व्यक्तीला दिलीप चाटे यांनी विक्री केली. त्यामुळे गावातील काही नागरिकांनी अंधव्यक्तीसह यांच्या कुटुंबाला मारहाण केली व त्यांचे पत्र्याचे शेड मोडून त्यांचा संसार उघड्यावर पडला म्हणून अंध विष्णू ओव्हाळ हे त्यांच्या कुटुंबासह दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजीपासून केज तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले होते. विष्णू ओव्हाळ व त्यांच्या कुटुंबियांनी सलग नऊ दिवस उपोषण केले होते. अंध विष्णू ओव्हाळ यांचा मुलगा आनंद विष्णू ओव्हाळ यांनी दिनांक १ मार्च २०२४ रोजी केज पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली. सदर फिर्यादी मध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी वरील गावचा रहिवासी असून माझे आई-वडील, तीन भाऊ यांच्यासह मला दोन बहिणी आहेत व माझ्या दोन्ही बहिणी सासरी नांदत आहेत. तांबवा येथे आम्ही व आमचे चुलते प्रभाकर शेषेराव ओव्हाळ जिल्हा परिषद शाळेच्या उत्तरेस मागील ३० ते ३५ वर्षापासून राहत आहोत .आम्ही राहत असलेल्या ठिकाणी चार भाऊ, आई वडील यांना राहण्यासाठी जागा अपुरी पडू लागल्याने आम्ही आमचे चुलते प्रभाकर ओव्हाळ यांच्या शेजारी पूर्वेस असलेल्या ३० बाय ४० च्या मोकळ्या जागेत आम्ही दहा पत्र्याचे शेड मारले होते. त्या शेडमध्ये आम्ही चौघे भाऊ राहत होतो .सदरचा मोकळा प्लॉट हा भगवान बाबा गृहनिर्माण संस्था यांच्या मालकीचा आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेचे सचिव दिलीप हरिभाऊ चाटे हे आमच्या घरी आले व माझ्या वडिलांना म्हणाले की, तुम्ही शेड मारलेली जागा ही माझ्या मालकीचीआहे, तुम्ही मला ५०,००० हजार रुपये द्या मी तुम्हाला या जागेची नोटरी करून देतो असे म्हणाले. आम्हाला सदर जागेची आवश्यकता असल्याने व ५०,००० हजार रुपये मध्ये जागा मिळत असल्याने आम्ही दिलीप चाटे यांना ५०,००० हजार रुपये देऊन सदर जागा नोटरी करून घेण्यास तयार झालो. दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी मी, माझे वडील, चुलते बाळासाहेब ओव्हाळ, माझे चुलत आजोबा सोपान ओव्हाळ असे आम्ही तहसील कार्यालय केज येथे ठरल्या प्रमाणे नोटरी करण्यासाठी आलो. तेथे दिलीप हरिभाऊ चाटे यांना रोख ५०,००० हजार रुपये दिले. दिलीप हरिभाऊ चाटे यांनी आम्हाला तांबवा येथील सर्वे नं.१२७ मधील पूर्व -पश्चिम ३० फूट व दक्षिण- उत्तर ४० अशी एकूण १२०० चौरस फूट खुल्या जागेची नोटरी करून दिली. सदर खुल्या जागेची चतुसिमा पूर्वेस:-नाला. पश्चिमेसः- ब्रह्मदेव प्रभाकर ओव्हाळ, दक्षिणे सः बिबीशन पंढरीनाथ लांब व उत्तरेस: रस्ता अशी असून, दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी आमच्या घरासमोर गोरख लांब, चिंगुबाई उर्फ मीरा चाटे, सिंधुबाई चाटे हे आले व ही जागा आमची आहे आमच्याकडे या जागेची नोटरी आहे असे म्हणून आम्हाला त्यांनी त्यांच्या कडे दिलीप हरिभाऊ चाटे याने चार महिन्यापूर्वी करून दिलेली नोटरी दाखवून आमच्या शेडची मोडतोड केली. आम्हाला शिवीगाळ, मारहाण केली. ही जागा आमची आहे .येथे तुम्हाला राहता येणार नाही असे सांगितले. सदर प्रकरणी आम्ही पोलीस ठाणे केज येथे फिर्याद दाखल केली. दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४-०० वाजण्याच्या सुमारास मी, माझे वडील हे दिलीप चाटे यांच्या शेतात जाऊन या बाबत जाब विचारला तेव्हां त्यांनी मला व माझ्या वडिलांना “महारड्यांनो, घेडग्यांनो तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून” हाकलून दिले. तरी तांबावा येथील सर्वे नं.१२७ मधील पूर्व पश्चिम ३० फुट व दक्षिण उत्तर ४० अशी एकूण १२०० चौरस फूट खुल्या जागेची नोटरी आमचे अगोदर गोरख रावसाहेब लांब गेला करून दिलेली असताना देखील आमच्या कडून ५०,००० हजार रुपये घेऊन त्या जागेची नोटरी दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी आम्हाला देखील करून देऊन आमची फसवणूक करून आम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आहे म्हणून माझी दिलीप हरिभाऊ चाटे रा. तांबवा याच्या विरुद्ध प्रत्यक्ष तक्रार देत आहे; असे आनंद विष्णू ओव्हाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. म्हणून आनंद विष्णू ओव्हाळ यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं९९/ २०२४ भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२०,५०४, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९-३(१) (एस) ट्रॉसिटी क्ट नुसार दिलीप हरिभाऊ चाटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये