ताज्या घडामोडी

      प्रा.प्रवीण सरवदे यांना पीएच.डी.प्रदान.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

        प्रा.प्रवीण सरवदे यांना पीएच.डी.प्रदान.

केज : तालुक्यातील होळ येथील भूमिपुत्र आडस येथील कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रवीण दत्तात्रय सरवदे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून लोकप्रशासन विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. संशोधन मार्गदर्शक प्रा डॉ विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. ग्रामीण विकास प्रशासनातील दलित वस्ती सुधार योजनेमधील लोकसहभागाचा विश्लेषणात्मक अभ्यास : विशेष संदर्भ बीड जिल्हा या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. लोकप्रशासन विषयातील अमरावती विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन करणारे पहिले संशोधक विद्यार्थी आहेत. या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे रमेशराव आडसकर,प्राचार्य डॉ अनिल किर्दंत ,प्रकाश लगस्कर,प्रा डॉ सुरेश कांबळे, डॉ हनुमंत सौदागर, सरपंच,योगेश शिंदे,बाळासाहेब घुगे,रमेश पाटोळे, मिलिंद व्हावळे,प्रा भैय्यासाहेब सरवदे,संदीप सरवदे आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये