क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

 दिवाळी अभ्यंग स्नानाच्या पूर्वसंध्येला  सासरवाडीत जावयचा खून!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

 दिवाळी अभ्यंग स्नानाच्या पूर्वसंध्येला  सासरवाडीत जावयचा खून!

अंबाजोगाई /प्रतिनिधी: अंबाजोगाई  तालुक्यातील डोंगर पिपळा येथे 35 वर्षे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली असून, या भयानक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली  आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि दीपावली अभ्यंग स्नानाच्या पूर्वसंध्येला   ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सचिन शिवाजी तिडके वय पस्तीस रा. भोगलवाडी हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा ता अंबाजोगाई जी.बीड येथे वास्तव्यास असलेला  व डोंगर पिंपळा गावचा जावई असून,गेल्या एक वर्षापासून सासरवाडी डोंगर पिंपळा येथे पत्नी व मुलांसोबत राहत होता. रात्री पासुनच सचिन तिडके बेपत्ता होता. आज दुपारी एक वाजता त्याचा मृतदेह डोंगर पिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारुन चेंदामेंदा केलेल्या अवस्थेतआढळून आला. घटनास्थळी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय घुगे व पोलीस कॉन्स्टेबल भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंबाजोगाई येथील  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उद्या सकाळी होणार असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. सदरील खून हा सासरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. व सचिन  च्या नातेवाईकांचाही हाच संशय आहे, कारण ते मृतदेहाजवळ गेले असता सासरवाडीकडील लोकांनी मयताच्या नातेवाईकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत. सचिन याच्या पश्चात दोन मुले,पत्नी आईवडील भाऊ भावजय असा परिवार आहे. ऐन दिवाळी च्या सणाचा आनंद उत्सव साजरा होत असताना तिडके कुटुंबीयावर शोक करण्याची वेळ आली असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये