ताज्या घडामोडी

गुन्हेगारीचा पोलिसांकडून पाठलाग : केजमधील रात्र घरफोडीचा पर्दाफाश; ४८ तासांच्या आत आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

गुन्हेगारीचा पोलिसांकडून पाठलाग : केज च्या  फुलेनगर भागातील  रात्र घरफोडीचा पर्दाफाश; ४८ तासांच्या आत आरोपीच्या आवळल्या मुसक्या!

​बीड / केज: गुन्हेगारीचा तातडीने पाठलाग करत बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) घरफोडीच्या गुन्ह्यात मोठे यश संपादन केले असून, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रात्र घरफोडीच्या गुन्ह्याचा तातडीने तपास करत व छडा लावत एलसीबी पथकाने अवघ्या ४८ तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची बहाद्दर कामगिरी केली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ​पोलीस स्टेशन केज येथे गु.र.नं ४८१/२०२६ कलम ३३१(४), ३०५(a) भा.न्या.सं. प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा, बीड कडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. ​दिनांक २९ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक केज हद्दीत गस्त घालून आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, प्रस्तुत पथकाला गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की, हा गुन्हा ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, ता. केज, जि. बीड) याने केला आहे. ​ अशा प्रकारची गोपनीय  ​माहिती मिळताच पोलिसांनी फुलेनगर भागातील राहत्या घरातून ऋषिकेश काळे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून कसून विचारपूस केली असता त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. ​तसेच चोरलेली रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने घरात लपवून ठेवल्याचे त्याने सांगितले. दोन पंचांसमक्ष पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला: ​रोख रक्कम: ₹ २,८१,०००/- ​सोन्या-चांदीचे दागिने: ₹ ७४,०००/- ​एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ३,५५,०००/- ​आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. ​कारवाई करणारे पोलीस पथक ​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक (अंबेजोगाई) बातमीदार, आणि श्रीमती चेतना तिडके व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ​पथकातील  ​पोलीस निरीक्षक: श्री. शिवाजी बंटेवाड, ​पोलीस उपनिरीक्षक: महेश विघ्ने ​अंमलदार: पोहवा बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण व चालक गणेश मराडे. ​ या बहाद्दर पोलीस कर्मचाऱ्यांनी पुण्याचा तपास 48 तासाच्या आत करून आरोपीला जेर बंद केल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

              ‘पाठलाग न्यूज’चा संदेश: गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांचा पाठलाग त्याला गजाआड पोहोचवतोच!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये