Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना केज तालुका प्रमुख पदी श्री पृथ्वीराज सुरेश पाटील यांची निवड.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

शिवसेना केज तालुकाप्रमुख पदी श्री पृथ्वीराज सुरेश पाटील यांचीनिवड.

केज:शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना‌.एकनाथरावजी शिंदे साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेनेचे महासचिव संजयजी मोरे साहेब, यांच्या आदेशाने बीड चे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बीडचे दुसरे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना केज तालुकाप्रमुख पदी पृथ्वीराज सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली. पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माझी राज्यमंत्री अशोक दादा पाटील यांचे चुलत बंधू सुरेश तात्या पाटील यांचे चिरंजीव आहेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश तात्या पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा जाहीर प्रचार केला होता. पृथ्वीराज पाटील यांच्या राजकारणाला आज पर्यंत काँग्रेसची परंपरा असताना त्यांची अचानक शिवसेनेचा राजकीय मार्ग स्वीकारून शिवसेनेचे केज तालुका प्रमुख पदावरील नियुक्तीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  यावेळी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश नवले, शिवसेना केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे , युवा सेना तालुकाप्रमुख सुग्रीव सक्राते, शहर प्रमुख बालासाहेब पवार , तालुका सचिव विकास काशीद,उपतालुकाप्रमुख महेंद्र चाटे , उपतालुकाप्रमुख चंद्रकांत इंगळे, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. संतोष बुडुक विभाग प्रमुख, दत्ता काकडे, युवा सेना शहरप्रमुख आकाश चाळक यांचे सह असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. पृथ्वीराज सुरेश पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये