Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धारूरजवळच्या आंबाचोंडी परिसरात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार;केज-धारुर परिसर हदरला! केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

धारूरजवळच्या आंबाचोंडी परिसरात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार;केज-धारुर परिसर हदरला! केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

​विशेष प्रतिनिधी/केज: केज- धारूर परिसर हादरवून टाकणारी एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जुन्या ओळखीचा फायदा घेत फिरायला जाण्याच्या बहाण्याने एका नराधमाने अल्पवयीन शाळकरी मुलीला आपल्या कारमध्ये बसवून धारूर तालुक्यातील आंबाचोंडी नामक परिसरातील डोंगराळ भागात नेले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, केज पोलिसांनी धीरज सांजुरे नामक आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.याबाबत ​पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदरची हृदयद्रावक घटना ७ जानेवारी रोजी घडली. आरोपी धीरज सांजुरे याने ओळख पाडलेल्या एका अल्पवयीन मुलीला खोट्या व बोगस प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘तुला छान ठिकाणी फिरायला घेऊन जातो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने तिला आपल्या खासगी कारमध्ये बसवले आणि केज शहरापासून दूर,निर्जन असलेल्या अंबाचोंडी परिसरातील डोंगराळ भागात नेले. तिथे त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केले. ​घटनेनंतर पीडित मुलीने घाबरलेल्या अवस्थेत घरी जाऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितला. मुलीची अवस्था पाहून पालकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी धीरज सांजुरे याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली. ​पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी धीरज सांजुरे याच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अत्यारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत तत्काळ गुन्हा नोंदवला असल्याची माहिती केज पोलिसांकडून मिळाली आहे. ​घटनेची माहिती मिळताच आरोपी धीरज सांजुरे हा फरार झाला आहे. स्थानिक नागरिक आणि समाजातील सर्व स्तरातून या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘या नराधमाला त्वरित अटक करून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणी होत आहे. ​ केज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती केज पोलिसांनी दिली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये