Breaking Newsक्राईम न्युजमहाराष्ट्र

बीड जिल्हा लाचखोरीच्या विळख्यात! जिल्ह्याच्या सर्वच विभागात महाभयंकर लाचखोरी !! लोकसेवक अलगद अडकत आहेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वागुरीत !!!आठ महिन्यांमध्ये २० सापळे, २५ लाचखोर जाळ्यात !!!!पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश.

पाठलाग न्युज/नेटवर्क:

बीड जिल्हा लाचखोरीच्या विळख्यात! जिल्ह्याच्या सर्वच विभागात महाभयंकर लाचखोरी !! लोकसेवक अलगद अडकत आहेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वागुरीत !!!आठ महिन्यांमध्ये २० सापळे, २५ लाचखोर जाळ्यात !!!!पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश.

बीड: पाठलाग न्युज नेटवर्क: बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बीड लाचलुचपत विभागाच्या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस खात्यामार्फत सर्वच खात्यातील लाचखोरीचे स्तोम किती माजले आहे, याची कल्पना करत असतांनाच लाचखोरांवरील कारवाई, प्रकरणातील चौकशी व चौकशीनंतर चार्जशीट ची परिपूर्ण ता करुन आरोपीला शिक्षा या बाबतचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत जिल्ह्यातल्या प्रत्येक खात्यात लाचखोरी, हप्तेखोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे भयानक चित्र निर्माण झाले असून, जानेवारी ते २२ ऑगस्ट या ८ महिन्यांच्या काळात बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपाधिक्षक तथा ज्यानां शिवशंकराने लाचखोरांची मस्ती उतरवण्यासाठी तिसरा डोळा दिला आहे त्या डिवायएसपी शंकर शिंदे यांनी एकूण २० सापळ्यांमध्ये २५ आरोपींना अटक करुन जेलची हवा दाखवली आहे.

एक अधिकारी व ४ कर्मचारी अशा पाच पोलिसांचा समावेश आहे. दरम्यान, गतवर्षी याच काळात एसीबीने १७ सापळ्याची झडप घातली होती. या वेळेस कारवाई मध्ये तीनने वाढ झाली आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झालेला असला, आणि या विभागातील कर्तव्यदक्ष आधिकारी कार्यक्षमतेने काम करत असले तरी, पोलीस दलासह शिक्षण,महसुल,आरोग्य व इतर क्षेत्रातली हप्तेखोरी आणि लाचखोरीचा कलंक कायम आहे. मागील वर्षी म्हणजे दि.०२/०४/२०२२ रोजी केज तालुक्यातील तांबवा येथील दोन शिक्षण संस्थेतील दोन पदाधिकाऱ्यांसह दोन मुख्याध्यापक व एक भाजपाचा पदाधिकाऱ्यासह बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपाधिक्षक शंकर शिंदे यांनी एकाच वेळी चौघांवर दीड लाखांची लाच घेतांना रंगीत हाताने झडपीले होते.या घटनेला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी,सम्धित खात्यांच्या सक्षम आधिकार्यांच्या असहकार व अनास्थेमुळे आध्यप चार्जशीट न्यायालयात दाखल नाही. अशाच प्रकारचा यशस्वी सापळा दि.२३/०८/२०२३ रोजी बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे साथीदारावर यशस्वी करण्यात आला .या धडाकेबाज कारवाईनंतर आता बीड च्या स्थानिक गुन्हे शाखेतील हप्तेखोरीचीही उघड चर्चा केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांपर्यंत या बाबी गेल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठण्याच्या शाखाप्रमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.यात काहीच शंका नाही. बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मंगळवार दि.२२/०८/2023 रोजी रात्री बीड च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्याच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगणारी धडाकेबाज कारवाई केली. अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात मदतीसाठी, वाहन जप्त न करण्यासाठी व आरोपीच्या जामिनासाठी २८ हजारांची लाच सम्धित इन्काॅयरी ऑफिसरने रतीब लावल्या प्रमाणे टप्प्याटप्प्याने स्वीकारली गेली. यातील १० हजार रुपयाचा हाप्ता स्वीकारतांना लाचखोरीचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने आणि पोलिस कर्मचारी रंजित पवार यांना रंगलेल्या हातासह पकडले गेले. त्यांनी लाच स्वीकारल्यावर कारवाईची शंका आल्याने लाचखोरांनी दुचाकीवरून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, बीडच्या बहाद्दर एसीबीने लाचखोरांचा “पाठलाग” करून,त्यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली. चालु वर्षाच्या साडेआठ महिन्यांमध्ये पोलिस दलावर झालेला हा एसीबीचा चौथा ट्रॅप असल्याची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगीतली. यापूर्वी गेवराई पोलिस ठाण्यात एका पोलिस कर्मचाऱ्याला पकडले होते. त्यानंतर वडवणी पोलिस ठाण्यातील कर्मचारीही लाचलुचपत च्या जाळ्यात अडकला होता.धारुर व अंभोरा पोलिस ठाण्याचेही हात लाचखोरीने ओले झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच शिरूर पोलिस ठाण्यातही एसीबीने एका कर्मचाऱ्याला लाच घेताना गजाआड केले होते. त्यानंतर आता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एका उपनिरीक्षकासह एक कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.बीड पोलिस दलातील एकूण पाच(०५) कर्मचारी आतापर्यंत लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक च्या झापाखाली डालले गेले असल्याची माहीती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उपाधिक्षक शंकर शिंदे यांनी पाठलाग न्युज नेटवर्क सोबत चर्चेत दिली. पोलीस खात्यात निर्माण झालेल्या लाचखोर वृत्तीमुळे आगामी काळात बीड च्या पोलिस अधीक्षकांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कठोर भूमीका घ्यावी लागणार आहे. अन्यथा बीड पोलिस दलाची प्रतिमा वरचेवर अशीच मलिन होऊन , पोलिसांवरील सर्वसामान्यांचा विश्वास नाहीसा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लाचखोरी व भ्रष्टाचार च्या स्पर्धेत मराठवाड्यात बीड हे दुसऱ्या स्थानावर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून स्पष्ट झाले आहे.मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण ३७ कारवाया केल्याचे समोर आनले आहे. त्यापाठोपाठ प्रस्तुत आठ महिन्यात बीडमध्ये २० कारवाया चालू वर्षात झाल्या असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.                             लाच मागितली तर संपर्क करा. कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितली तर, नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाण्याची व त्याला पुर्ण पणे संरक्षणदेण्याची हमी दिली जाईल. नागरिकांनी पुढे होऊन तक्रारी करणे आवश्यक आहे. – शंकर शिंदे, पोलिस उपअधीक्षक, एसीबी, बीड.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये