केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील प.स.सदस्य पिन्टू ठोंबरे यांच्या वृक्षलागवडीचे काम खरोखर अनुकरण करण्यासारखेचं! –जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे.
केज:केजतालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील दहिफळ प.स.चे सदस्य दत्तात्रय ऊर्फ पिन्टू ठोंबरे यांनी केलेले वृक्षलागवडीचे काम खरोखर प्रत्येक गावाने अनुकरण करण्यासारखेचच असल्याचे मनोगत बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केले. बीड जिल्ह्यात नरेगा योजना काही प्रमाणात वादग्रस्त ठरत असताअसतांना दहिफळा वडमावली येथील वृक्ष लागवडीचे कार्य जिल्ह्यासाठी अनुकरणीय आहे,अशा शब्दात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांचे कौतुक केले.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली गावातून वडमाऊली देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड मनरेगा योजने अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पंचायतसमितीचे माजी सदस्य दत्ताञय (पिंटू) ठोंबरे यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे.यशस्वी वृक्ष लागवडीचा आनंदोत्सव साजरा करत वृक्षांचा वाढदिवस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लहानमुलांच्या हस्ते केक कापून बुधवारी दि.२३ रोजी केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथे साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुंडे बोलत होत्या. व्यासपीठावर रोहयोच्या उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील, अंबाजोगाईचे उप विभागीय अधिकारी शरद झाडके, केज प.स.चे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे,जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचेउपअभियंता श्री.भिसे,नायब तहसीलदार आशा वाघ,शाखाअभियंता श्रीमती.सासवडे, मा. शिक्षणविस्तारअधिकारी सुनील केंद्रे,विस्तार अधिकारी सखाराम काशीद,सरपंच सौ.अनिता दहिफळकर,विड्याचे सरपंच सूरज पटाईत, येवत्याचे सरपंच विलास जोगदंड,डॉ.बालासाहेब कराड,उपसरपंच तथा वडमाऊली देवस्थानचे अध्यक्ष येडूनाना ठोंबरे, वडमाऊली देवस्थानचे सचिव भीकचंद ठोंबरे, शिवकृपा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सखाहरी गदळे,वडमाऊली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शशिकांत दहिफळकर अदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ पुढे बोलतांना म्हणाल्या की, दहिफळ वडमाऊली येथील वडमाऊली देवी हे जागृत देवस्थान आहे. याला “ब “दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासाला प्राध्यान्य देणार आहे. शासनाकडे प्रस्तावित कामा व्यतिरिक्त विकास कामांचा प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.तसेच दत्ताञय (पिंटु) ठोंबरे यांच्या पुढाकारातून झालेल्या यशस्वी वृक्ष लागवडीचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दत्ताञय (पिंटू ) ठोंबरे यांनी केले.कार्यक्रमास हजेरी लावल्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे आभार मानले.राष्ट्रवादी डॉ.सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.संतोष ढाकणे यांनी सूत्रसंचलन करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षांची पाहणी केली. यावेळी तलाठी श्रीमती. भिसे,ग्रामपंचायत सदस्य कचरू ठोंबरे,भास्कर मोरे, माजी सैनिक शिवाजी मोराळे,सुभाष गदळे,बंसी ठोंबरे,हरिदास ठोंबरे, चांगदेव मुंडे,वसंत ठोंबरे, बालासाहेबठोंबरे,संजीवन ठोंबरे,हनुमंत ठोंबरे, रामहरी ठोंबरे,भीमराव हांगे,बिभीषण मुंडे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.