क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज तालुक्यातील सारुळ पाटीवरील “रेणुका कला” केंद्रावरच्या नर्तकीचा बर्डावरच्या “राजयोग” लॉजवर खून.दारु-बाया व गुन्हेगारीने गजबजलेल्या अंबाळाच्या बरड परिसरात एकंच खळबळ! सहा जणांवर गुन्हा दाखल.साह्यक पोलीसअधिक्षक पंकज कुमावत यांची शोधकारवाई.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

केज तालुक्यातील सारुळ पाटीवरील “रेणुका कला” केंद्रावरच्या नर्तकीचा बर्डावरच्या “राजयोग” लॉजवर खून.दारु-बाया व गुन्हेगारीने गजबजलेल्या अंबाळाच्या बरड परिसरात एकंच खळबळ! सहा जणांवर गुन्हा दाखल.साह्यक पोलीसअधिक्षक पंकज कुमावत यांची शोधकारवाई.

केज: केज तालुक्यातील रेणुका कला केंद्रावरील नर्तकीचे काम करणार्‍या तरुणीशी कला केंद्राच्या मालकाला मोबदला देऊन प्रस्तुत
नर्तकी सोबत अनैतिक संबंध निर्माण करत प्रियकराने तिला कला केंद्राजवळील बरड फाट्यावर याच कृत्यासाठी बांधलेल्या “राजयोग” लॉजवर नेऊन तिच्या तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करत तिचा खून केल्याची घटना केज तालुक्यातील बरड फाटा येथे दोन महिन्यांपूर्वी घडली असून, घडलेले क्रुर कृत्ये तब्बल दोन महिन्यांनंतर उघडकीस आल्यानंतर या कृत्याशी डायरेक्ट सम्बन्ध असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने बरड व नांदूरफाटा परिसरात एकंच खळबळ ऊडाली आहे. बीड चे साह्यक पोलीस आधिक्षक पंकज कुमावत यांनी केज
परिसरातील कलाकेंद्राच्या आडून लपलेली गुन्हेगारी दुसऱ्यांदा उघड केल्यामुळे त्यांचे परीसरात पून्हा एकदा भरभरुन आभिनंदन होत आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, शीतल कांबळे नावाची नर्तकी केज तालुक्यातील सारुळ पाटीवरील रेणुका कला केंद्रावर कामाला होती.नांदेड जिल्ह्यातील शेलगाव (ता. अर्धापूर) येथील नर्तकी शीतल रंगनाथ कांबळे (२६) हिचा बाबूराव गोरे यांच्याशी विवाह झाला होता. बाबूराव यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर ४ वर्षांचा मुलगा परशुरामसह कुटुंबीयांची जबाबदारी तिच्यावर होती. आई कुशावर्ता रंगनाथ कांबळे यांनी त्यांची मोठी मुलगी वर्षाबरोबर शीतलला कला केंद्रावर नर्तकी म्हणून काम मिळवले. गतवर्षी श्रावण महिन्यात केज-मांजरसुंबा मार्गावरील सारूळ फाटा येथील रामधन ढाकणे यांच्या रेणका कला केंद्रावर या मायलेकींनी कला केंद्र मालक रामनाथ ढाकणे बरोबर नृत्यकलेचा करार करून त्यांच्याकडून पाच लाख उचल घेतली.शीतलचे हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील गजानन ऊर्फ गजू कराळे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. शीतलला कायमस्वरूपी नेण्यासाठी गजाननने कला केंद्र मालक रामनाथ ढाकणेला डिसेंबर २०२२ मध्ये १ लाख २० हजारांचा धनादेश दिला. परंतु, त्यानंतर शीतलचे अन्य लोकांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय गजाननला आल्याने त्याने मित्र परभणीचे घुगे सोबत कला केंद्रावर येऊन शीतलबरोबर शाब्दिक बाचाबाची केली. त्यानंतर सव्वादोन महिन्यांपूर्वी  कला केंद्रावर काम करणाऱ्या शीतलला गणेशच्या चारचाकीतून गजाननने  मध्यरात्री “राजयोग” लॉजवर नेले व गळ्यावर वार करत शीतल चा खून केला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघड झाला. पण तक्रार दोन महिन्यांनी दिली . गजानन हा त्याचा मित्र घुगे याचे सोबत रेणुका कलाकेंद्र येथे येत होता. गजानन उर्फ गजु यास शितल हिचे इतर लोकांसोबत देखील संबंध असल्याचा संशय यायला लागला होता. त्यातुन एकदा गजानन कराळे व त्याचा मित्र घुगे असे रेणुका कलाकेंद्र येथे आले तेव्हा मुलगी शितल व गजानन कराळे या दोघात शाब्दिक बाचाबाची झाली होती. नंतर सुमारे सव्वा दोन महिन्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी रात्री १:३० वा च्या सुमारास गज्जू उर्फ गजानन कराळे हा गणेश ढाकणे यांच्या गाडीतून शितलला रेणुका कला केंद्रातून घेऊन राजयोग लॉजवर गेला. शितल ही सकाळी परत आली नाही म्हणून तिच्या आईने गणेश ढाकणे यांच्या वडिलांकडे चौकशी केली असता ती लवकर येईल असे सांगितले. त्यानंतर ९:३० च्या दरम्यान याच कला केंद्रावर काम करणारी शमीम भाभी हिने शितलच्या आईला व मोठ्या बहिणीला सोबत घेऊन गणेश ढाकणे यांच्या सोबत राजयोग लॉजवर गेली ,आणि त्यांनी वरच्या मजल्यावर रूममध्ये जाऊन पाहिले असता शितल ही पलंगावर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर कंठस्थानी शस्त्राचा वार करण्यात येऊन तिचा खून झालेला होता. या बाबत त्यांनी लॉजचे मॅनेजर राठोड यांच्याकडे चौकशी केली असता शितल सोबत लॉजवर मुक्कामी असलेला गज्जू उर्फ गजानन कराळे हा पहाटे टूथ पेस्ट आणण्याच्या बहाण्याने मोटार सायकल घेऊन फरार झाला असल्याचे समजले. त्यानंतर मयत शितलची आई व बहिणीने पोलिसाना माहिती देण्याचे म्हणताच तिच्या हातातील मोबाईल शमीम भाभी हिने हिसकावून घेतला आणि पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला त्रास होईल व तुम्ही जेलात जाल अशी धमकी दिली. मयत शितल हिची आई व बहीण अशिक्षित असल्याने त्या घाबरून गेल्या त्यानंतर गणेश ढाकणे याचे चारचाकी वाहनात शितल हिचे प्रेत शालीत गुंडाळुन रामनाथ ढाकणे, राठोड, वसुदेव सारूक यांनी टाकले. त्यानंतर प्रेत घेवुन मयत शितलची आई, बहीण, तिचा लहान मुलगा यांना सोबत घेऊन शमिम भाभी, गणेश ढाकणे, कला केंद्र मालक रामनाथ ढाकणे यांनी परभणी जिल्ह्यातील त्यांच्या गावी वांगी येथे गेले आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करून खुनाचा पुरावा नष्ट केला. मात्र १५ दिवसानंतर शितलच्या आईने पुन्हा पोलिसात तक्रार देण्याची ईच्छा व्यक्त करताच ही घटना कोणाला सांगू नका. असे म्हणून त्यांना धमकी देण्यात आली. तसेच शितल हिला चक्कर आल्याने ती कपाटावर पडून तिचा मृत्यू झाला अशी खोटी माहिती शितलच्या गावी नातेवाईकांना दिली. तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर मयत शितल हिच्या आईने सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या कानावर घातला.त्यानंतर दि. २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ३:०० रेणुका कला केंद्रातील नृत्यांगना शितल हिला राजयोग लॉजवर नेऊन तिचा भोकसून व नाक तोंड दाबुन खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावल्या प्रकरणी गज्जू उर्फ गजानन शिवराम कराळे (रा. डिग्राज जि. हिंगोली), रामनाथ ढाकणे, (रा. सारूळ ता. केज), शमिम भाभी, (रा. परभणी), वासुदेव सारूक (रा. जोला ता. केज), लॉजचा मॅनेजर राठोड (रा. वसमत जि. हिंगोली) आणि घुगे (रा. परभणी) या सहा जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ५०३ / २०२३ भा. दं. वि. ३०२, ३०१, १२० (ब), २१२, ३७०, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये