ताज्या घडामोडी

खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर देवगावच्या उपोषणकर्त्यांचे आमरण उपोषण मागे! ​कचराकुंडी घोटाळा व भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीचे आश्वासन; ज्यूस पाजून उपोषणाची तातडीने सांगता.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर देवगावच्या उपोषणकर्त्यांचे आमरण उपोषण मागे! ​कचराकुंडी घोटाळा व भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीचे आश्वासन; ज्यूस पाजून उपोषणाची तातडीने सांगता.

​केज / बीड (विशेष प्रतिनिधी): केज तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कथित कचराकुंडी खरेदी गैरव्यवहार आणि २ लाख रुपयांच्या रिकव्हरीप्रकरणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत प्रशासनाकडून सखोल चौकशी व कठोर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर आज दुपारी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. ​ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई, २ लाखांची वसुली आणि सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील कामांचे दस्तऐवज सील करून फेरलेखापरीक्षण (Audit) करण्याच्या मागणीसाठी देवगावचे तरुण गणेश अर्जुन मुंडे, बालासाहेब रामहारी मुंडे, बंडू नामदेव मुंडे, रामेश्वर तुकाराम नागरगोजे, बापू नामदेव मुंडे, पांडुरंग रामा मुंडे, ग्रा.पं. सदस्य छंदर रामा मुरकुटे, अशोक निवृत्ती मुंडे यांच्यासह ग्रामस्थ दोन दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले होते. ​खासदार सोनवणे यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (CEO) चर्चा करून दोषींवर कडक कारवाईचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. खासदार महोदयांच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले असून, प्रशासनाने वेळेत चौकशी करून ठोस कारवाई न केल्यास पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देवगावच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये