प्रतिनिधी/केज: भारतीय सैन्य दलात उल्लेखनीय सेवा बजावत असताना देवगावचे सुपुत्र मा. श्री.उत्तरेश्वर महिपती मुंडे (अण्णा) यांची ‘सुभेदार मेजर’ पदी पदोन्नती झाल्याबद्दल, देवगाव नगरीच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
देवगाव येथील तरुण कार्यकर्ते, नेते व नागरिकांनी सुभेदार मेजर म्हणून प्रमोशन झालेल्या उत्तरेश्वर मुंडे उर्फ अण्णा याचे प्रेमपूर्वक व भरभरून स्वागत केले.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक प्रा. हनुमंत भोसले सर यांनी भूषवले तर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून याच गावचे सुपुत्र कॅप्टन रामराव शेषराव नागरगोजे उर्फ अण्णा आवर्जून उपस्थित होते.यावेळी विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैया) मुंडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमाकांत (बापू) मुंडे, केज परिसरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ अॅड. नवनाथ मुंडे आणि देवगाव चे सरपंच अतुल (दादा) मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारार्थीं श्री. उत्तरेश्वर मुंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मान्यवरांनी त्यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. मुंडे यांच्या या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना अनेक वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. सत्कारमूर्ती श्री उत्तरेश्वर मुंडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आपण या पदापर्यंत पोहोचल्याचे श्रेय आमचे पहिल्यापासून चे मार्गदर्शक या गावचे सुपुत्र कॅप्टन राम नागरगोजे यांना असल्याचे त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम विडा गटाचे माजी जि प सदस्य विजयकांत मुंडे यांनी आयोजित करण्यासाठी सहकार्य केले होते तर, या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन या गावचे उपसरपंच माजी सैनिक सुभाष मुंडे व त्यांच्या मित्र मंडळ तरुणांनी केले होते. या सत्कार सोहळ्याला गावातील माजी सैनिक शरद मुंडे, तसेच महादेव धाकणे, आश्रुबा मुरकुटे, गबबाजी गायकवाड, रामहारी नागरगोजे, चांगदेव मुंडे, बाळासाहेब मुंडे, दादाराव मुंडे, एडवोकेट सुदर्शन मुंडे, एडवोकेट सौ. जयश्री मुंडे, एडवोकेट वैजनाथ मुंडे, सुमंत मुंडे, उजेश्वर मुंडे, महादेव कांबळे, रविंद्र मुंडे, गोपिनाथ मुंडे, बाबासाहेब नागरगोजे, राजाभाऊ नागरगोजे, रामहारी मुंडे, गणेश मुंडे, बाबा मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे गावातील तरुणांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण झाली असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.