ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

परळी, धारूर व अंबाजोगाईतील भाजप तालुका अध्यक्ष निश्चित केवळ औपचारिक घोषणा बाकी. -परळीतून प्रा.डॉ.बिभीषण फड, अंबाजोगाईतून संजय गंभीरे, केजसाठी शरद इंगळे तर धारूर तालुका अध्यक्ष पदासाठी संदीप काचगुंडे यांची नावे निश्चित?

पाटला न्यूज / परमेश्वर गीते यांचे कडून:

केज, परळी, धारूर व अंबाजोगाईतील भाजप तालुका अध्यक्ष निश्चित केवळ औपचारिक घोषणा बाकी.

-परळीतून प्रा.डॉ.बिभीषण फड, अंबाजोगाईतून संजय गंभीरे, केजसाठी शरद इंगळे तर धारूर तालुका अध्यक्ष पदासाठी संदीप काचगुंडे यांची नावे निश्चित?

बीड : बीड जिल्ह्यातील भाजपच्या तालुका पदाधिकारी यांच्या निवडीचा कालावधी संपुष्टात आला असून नव्या तालुकाध्यक्षांचे वेध बीड जिल्ह्याला लागले आहेत. तालुकाध्यक्षाची निवड करताना पक्ष नेतृत्व वेगवेगळे निकष लावत असतात.त्यानुसार परळी, केज, अंबाजोगाई व धारूर तालुक्याच्या अध्यक्षाच्या निवडी अंतिम मानल्या जात असून पुढील आठवड्यात किंवा याच आठवड्याअखेर नवीन तालुकाध्यक्ष या चारही तालुक्यासह इतर तालुक्यांना मिळणार आहेत. परळी तालुकाध्यक्ष पदासाठी प्रा.डॉ.बिभीषण फड, अंबाजोगाई संजय गंभीरे,केज शरद इंगळे व धारूर तालुका अध्यक्ष पदासाठी संदीप काचगुंडे यांची नावे पुढे आले आहेत आणि तेच अंतिम होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 19 मंडळामधून तालुकाध्यक्ष निवडला जाणार आहे. सर्वच तालुक्यात पक्षनिरीक्षक जाऊन आले आहेत. त्या- त्या ठिकाणचा अहवाल पक्षनिरीक्षकांनी पक्षाकडे व नेतृत्वाकडे पाठवला आहे.आष्टी मतदार संघात मात्र संघर्ष दिसून आला त्या ठिकाणी ना. पंकजाताई मुंडे विरुद्ध आ.सुरेश धस समर्थकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन आरोपांची राळ उठवली व बैठका वादळी झाल्या परंतु इतर तालुक्यातील इच्छुकांनी मात्र सर्व अधिकार ना.पंकजाताई मुंडे यांना दिले आणि त्याच तालुकाध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्तीची निवड करतील अशी जबाबदारी देण्यात आली.येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय, सामाजिक समीकरणाचा व परिस्थितीचा अभ्यास करून तालुकाध्यक्ष निवडावा लागतो सर्व जाती धर्माचा समतोल राखावा लागतो. समन्वय आणि समन्यायाची भूमिका ठरवणारा तालुकाध्यक्ष हवा असतो.त्या अनुषंगाने परळी,केज, धारूर,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अंतिम झाले असून येत्या आठवड्यात किंवा याच आठवड्याच्या शेवटच्या क्षणी निवडी जाहीर होणार आहेत. केज तालुकाध्यक्ष म्हणून शरद इंगळे यांची निवड होणार असल्याची माहिती आहे.सध्या शरद इंगळे हे केज विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.ना.पंकजाताई मुंडे व आ.नमिताताई मुंदडा यांचे विश्वासू सहकारी आहेत शिवाय मराठा समाजातील प्रमुख चेहरा मानला जातो.पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देऊ शकतात व त्याची तयारी आहे. शिवाय मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मितभाषी आणि समन्वय हे त्यांचे महत्त्वपूर्ण गुण मानले जातात. म्हणून त्यांच्या नावाला अधिक पसंती असल्याचे कळते.अंबाजोगाईतून संजय गंभीरे यांचे नाव आघाडीवर आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संजय गंभीरे यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. संघटन कौशल्य आणि पूर्णवेळ पक्ष कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ‘ जीती हुई बाजी हारणेवाले को बाजीगर कहते है ‘ त्याप्रमाणे त्यांनी हातातून गेलेली बाजी पुन्हा परत मिळवण्यासाठी केलेले मेहनत हे या मतदारसंघाला माहिती आहे. ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली केज विधानसभा मतदारसंघाची ही जागा जिंकण्याचे कसब संजय गंभीरे यांनी दाखवले आहे. मुंडे व मुंदडा कुटुंबातील दुवा म्हणून त्यांचे काम आहे म्हणून त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असल्याचे समजते. धारूर तालुकाअध्यक्ष पदासाठी संदीप शिवाजीराव काचगुंडे यांचे नाव पुढे आले आहे. 31 वर्षाचा हा तरुण आसारडोह गावचा रहिवासी आहे. माजलगाव मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीला चांगले मताधिक्य देण्याचे काम संदीप यांनी केले आहे. त्यांची आई ही पंचायत समिती सभापती म्हणून राहिलेली आहे. शिवाय राजकीय पिंड आहे आणि लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे व काचगुंडे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत म्हणून त्यांचे नाव अंतिम मानले जाते. परळी तालुकाअध्यक्ष पदासाठी प्रा. डॉ. बिभीषण फड यांचे नाव पुढे आले आहे. प्रा.डॉ.फड हे पंकजाताई मुंडे यांचे निष्ठावंत सहकारी आहेत.तसेच परळी पंचायत समितीचे काही काळ सभापती राहिलेले आहेत. राजकीय व सामाजिक कार्यात हातखंडा आहे. शिक्षण क्षेत्रात असल्याने त्यांना सामाजिक जाणीव आहे.ध्येयनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. समन्वय व संघटन असल्याने त्यांच्यावर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. एकूणच बीड जिल्ह्यातील तालुकाअध्यक्ष पदाची निवड ही स्वतः पंकजाताई मुंडे करणार आहेत. केवळ आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यातील अध्यक्षपदाचा पेच आहे. त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे.येत्या आठवड्यात नवीन तालुकाध्यक्ष मिळणार एवढे मात्र निश्चित!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये