क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तीन अपत्य असल्याने शिक्षकाची नोकरी घालवण्याची भीती दाखवून दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या खंडणीचा गुन्हा दाखल.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

तीन अपत्य असलेल्या शिक्षकाला नोकरी घालवण्याची भीती दाखवून दहा लाखाची खंडणी मागणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल.

नांदेड : तीन अपत्य असल्याने तुमच्याविरुद्ध तक्रार करून नोकरी घालवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ५० हजारांची खंडणी घेताना एका महिलेला रंगेहात पकडले. नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागणारे, चोरी, घरफोडी तसेच अवैध व्यवसाय चालविणाऱ्या विरोधात कारवाई केली जात आहे. मुखेड तालुक्यातील वसूर येथील धोंडिबा रामराव मुळे (वय ५२) हे भारतमाता ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षक आहेत. त्यांना तीन अपत्य असल्याने माहिती अधिकार समितीच्या राज्य अध्यक्षा वैशाली गुंजरगे, प्रशांत मुळे व अन्य दोघांनी तुम्हाला तीन अपत्ये असल्याने तुमची नोकरी घालवू, तुम्हाला जेलमध्ये पाठवू, अशी धमकी देत १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून खंडणी मागण्याचा हा प्रकार सुरू होता. २३ एप्रिल रोजी या प्रकरणात धोंडिबा मुळे यांनी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. वर्कशॉप परिसरातल्या एका ज्यूस सेंटरवर ५० हजार रुपयांची खंडणी घेताना वैशाली कृष्णा गुंजरगे हिला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, जमादार विशाल माळवे, गजानन किडे, सविता केळगेंद्रे, अदनान खान पठाण, सविता बाचेवाड यांनी ही कारवाई बजावली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक हे करत आहेत. भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले असून, फरार आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये