क्राईम न्युजग्रामीण वार्तामहाराष्ट्रसंपादकीय

सेवानिवृत्तीच्या लाभासाठी सेवानिवृत्त शिक्षकाकडून 90 हजाराच्या लाचेच्या सेकंड हप्त्यातील पन्नास हजाराची लाच घेताना पेन्शन विभागाचा लिपिक संतोष कुडके एसीबीच्या ताब्यात! लाचेच्या वाट्यात शिक्षण अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे संकेत.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

सेवानिवृत्तीच्या लाभासाठी सेवानिवृत्त शिक्षकाकडून 90 हजाराच्या लाचेच्या सेकंड हप्त्यातील पन्नास हजाराची लाच घेताना पेन्शन विभागाचा लिपिक संतोष कुडके एसीबीच्या ताब्यात!

लाचेच्या वाट्यात शिक्षण अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे संकेत.

  • बीड – बीडचा माध्यमिक शिक्षण विभाग भ्रष्टाचार व गैरप्रकाराणे भयानक पोखरला असून शिक्षण अधिकारी व पेन्शन विभागाचा वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यांनी संगनमताने भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडला असतानाच एका सेवानिवृत्त शिक्षकाकडून पेन्शनचा प्रस्ताव पुढे ढकलण्यासाठी 90 हजाराच्या लाचेतील पन्नास हजाराची बाकी लाच घेताना आज वरिष्ठ लिपिक संतोष कुडके याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच झडप घातल्याने बीडच्या शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. बीड जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात सर्रास पैशाची देवाणघेवाण होते. विशेषतः प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागात लाखो रुपयांची उलाढाल बिनबोभाटपणे होते. सेवानिवृत्त शिक्षकांची फाईल असो कि मागील काळातील अप्रूव्हल काढणे ही सगळी कामे पैशाशिवाय होतच नाहीत. माध्यमिक शिक्षण विभागात सेवानिवृत्त शिक्षकाचे सेवानिवृत्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बीडच्या शिक्षण कार्यालयात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या संतोष कुडके यांनी नव्वद हजार रुपयांची मागणी केली होती. यातील चाळीस हजार रुपये अगोदरच आडवांस म्हणून घेतले होते. उर्वरित पन्नास हजार रुपये स्वीकारताना आज बुधवारी कार्यालयातच अटक केली. माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोरी यामुळे उघडपणे चर्चेत आली आहे. या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विस्तार अधिकारी असणारे हजारे असोत कि, काकडे हे डेपोटेशन वर कार्यरत आहेत. तर शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे हे देखील वशिल्याच्या व वरिष्ठांच्या सावली खालून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षण संस्था चालकांच्या ताटाखालचे मांजर बनून फाईल वर वजन ठेवल्याशिवाय काम करत नाहीत असे आरोप अनेकदा झाले आहेत. शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या भ्रष्ट व गैर कारभारामुळे रीतसर सेवानिवृत्त झालेले अनेक शिक्षक विनाकारण देशोधडीला लागत आहेत.                                                 घटनेची सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा सेवा निवृत्ती वेतन मंजुर करणे बाबतचा प्रस्ताव मुख्याध्यापक पारनेरकर महाराज विद्यालय यांनी दिनांक 23/10/2024 रोजी शिक्षणाधिकारी कार्यालय, माध्यमिक विभाग जिल्हा परिषद बीड यांच्याकडे दाखल केला होता . सदर सेवा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करुण महालेखापाल ,नागपूर यांना पाठवण्यासाठी लोकसेवक संतोष कुडके यांनी 100000 रुपयांची मागणी तक्रारदार यांना केली होती. तडजोड अंती 90000 रुपये देण्याचे ठरले . त्यापैकी 40000 रुपये तक्रारदार यांनी यापुर्वीच दिले होते . उर्वरित लाच रक्कम देण्याची तक्रारदार यांना ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र. वि . बीड येथे आज रोजी तक्रार दिली .यावरुन लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक संतोष कुडके यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांचे कामाचा मोबदला म्हणुन 90000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . तसेच या पुर्वी 40000 रुपये स्विकारल्याचे मान्य केले . त्यावरुन लोकसेवक यांचे कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता तक्रारदार यांचेकडून लोकसेवक संतोष कुडके यांनी पंचासमक्ष लाच रक्कम 50000 रुपये स्वीकारताच त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले .लोकसेवक कुडके यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजी नगर,बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री शंकर शिंदे यानी ही कारवाई  श्री संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, श्री.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड लाचलुचपत विभागाचे स.फौ सुरेश सांगळे ,हनुमान गोरे , संतोष राठोड, भारत गारदे, अविनाश गवळी , गणेश मेहेत्रे ,श्रीराम गिराम , अमोल खरसाडे यांच्या सहकार्याने सापळा कार्यवाही पूर्ण केली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये