बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पो.कॉ.अनंत इंगळे यांची एस पी कार्यालयातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.
बीड : केस तालुक्यातील कळंबा येथील रहिवासी आणि बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पो कॉ अनंत इंगळे यांनी काल रात्री मुख्यालया मधेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी निदर्शनास आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा समोर आलेला वृत्तांत असा की, पोलीस कॉन्स्टेबल अनंत इंगळे हे काही काळ अंबाजोगाई, परळी या ठिकाणी कार्यरत होते. मागील काही महिन्या पासून ते बीड मुख्यालयात कार्यरत असून काल रात्री ड्युटी वर असतानाच इंगळे यांनी आज पहाटे एस पी कार्यालयातील झाडाला गळफास घेउन आपली जीवन यात्रा संपवली असल्याचे समोर आले आहे. इंगळे यांनी अशाप्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट का केला? त्यांच्या आत्महत्येमागं नेमकं कारण काय? याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आत्महत्या केल्यानं बीडच्या पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आसुन अनंत इंगळे यांना दारूचे प्रचंड व्यसन जडलेले होते, अशी ही चर्चा केली जात असून, दारूच्या नशेत तर याने हे टोकाचे पाऊल उचलले नसेल ना याचा शोध पोलीस तपासात घेतला जात आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.