ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व असवैधानिक  वक्तव्यावरून मनोज जरांगे वर परळीत गुन्हा दाखल.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व असवैधानिक  वक्तव्यावरून मनोज जरांगे वर परळीत गुन्हा दाखल.

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परभणीच्या मूक मोर्चात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एकेरी भाषेचा उल्लेख केला. तसेच,  दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी “मुंड्या फिंड्या, हरामखोर अवलादी” अशा प्रकारचे असंवैधानिक व गैर असे शब्दप्रयोग संवैधानिक पदावरील व्यक्ती ना. धनंजय मुंडे यांच्या व एका विशिष्ट समाजाच्या बाबत वापरले होते. त्यामुळे बदनामीकारक वक्तव् व सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात मनोज जरांगे यांच्याविरुद्ध असंज्ञेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथे झालेल्या मूक मोर्चात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाषण करताना मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन बोलताना जरांगे म्हणाले की, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. याच भाषणात बोलताना “मुंडया-फिंड्या, हरामखोर अवलादी” असे शब्दप्रयोगही केले होते. यावरून मुंडे समर्थकांमधून व मोठा संताप व्यक्त केला जात होता. परळी पोलिसांत जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याच अनुषंगाने आज सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर शेकडोच्या संख्येने धनंजय मुंडे समर्थक जमा झाले होते . मनोज जरांगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोरच या जमावाने ठिय्या धरला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची आक्रमक भूमिका या शेकडो समर्थकांनी घेतली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार अर्ज घेत त्याबाबतची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अखेर तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १७४ अंतर्गत असंज्ञेय अपराध दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याची आक्रमक भूमिका या शेकडो समर्थकांनी घेतली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार अर्ज घेत त्याबाबतची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर अखेर तुकाराम बाबुराव आघाव यांच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्या विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १७४ अंतर्गत असंज्ञेय अपराध नुसार (एनसीआर) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परळी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये