ताज्या घडामोडी

केज उपजिल्हा रुग्णालयात असंवेदनशीलतेचा कळस; १३ वर्षांच्या पीडितेची ९ तास ससेहोलपट; वैद्यकीय अधीक्षकांसह ६ जण तडका फडकी निलंबित! केज पोलीस ठाणे ही कारवाईच्या रडारवर.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

केज उपजिल्हा रुग्णालयात असंवेदनशीलतेचा कळस; १३ वर्षांच्या पीडितेची ९ तास ससेहोलपट; वैद्यकीय अधीक्षकांसह ६ जण तडका फडकी निलंबित!

केज पोलीस ठाणे ही कारवाईच्या रडारवर.

​केज / क्राईम प्रतिनिधी: केज तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला काळीमा फासणारी आणि संतापजनक घटना केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ग्रामीण रुग्णालयत समोर आली असून,एका १३ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल ९ तास ताटकळत ठेवून अमानुष असंवेदनशीलता दाखवणाऱ्या केज उपजिल्हा रुग्णालयावर अखेर राज्य शासनाचा बडगा उगारला गेला आहे. या गंभीर प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता केंद्रे यांच्यासह दोन महिला डॉक्टर आणि ३ कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे बीड आणि लातूर परिक्षेत्रातील आरोग्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​ या अमानुष्य घटनेचा ‘पाठलाग’चा ग्राऊंड रिपोर्ट! ​एका अत्यंत संवेदनशील गुन्ह्यातील १३ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीला कायदेशीर वैद्यकीय तपासणीसाठी (Medical Examination) सकाळी ११ वाजता केज उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. नियमानुसार अशा संवेदनशील गुन्ह्यांमध्ये पीडितेची तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया तात्काळ करणे बंधनकारक असताना, रुग्णालयातील कर्तव्य शून्य आणि संवेदना हरवलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कमालीची मुजोरी आणि निष्काळजीपणा दाखवला. ​सकाळी ११ वाजता आणलेल्या पीडितेची तपासणी करण्यासाठी रात्रीचे ८ वाजले! तब्बल ९ तास त्या निष्पाप पीडितेला आणि तिच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या आवारात मानसिक छळ सहन करावा लागला. ‘आज डॉक्टर नाहीत’, ‘वेळ लागेल’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन शासकीय कर्तव्यात कसूर करण्यात आली. ही बाब वृत्तमाध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्ह्यात एकच संताप व्यक्त होत होता. ​ &चौकशी समितीचा दणका; थेट निलंबनाचे आदेश. @ ​या प्रकरणाची गंभीर दखल घेत लातूर आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक (CS) डॉ. सतीशकुमार सोळंके यांनी तातडीने चौकशी समिती नेमली. या समितीने रुग्णालयात येऊन केलेल्या प्राथमिक चौकशीत ‘कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा आणि पीडितेबद्दल कमालीची असंवेदनशीलता’ असल्याचे स्पष्ट झाले. ​समितीने पाठवलेल्या वास्तव अहवालावरून मुंबई आरोग्य सेवा संचालनालयाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत खालील ६ जणांना निलंबित केले आहे:_ १. डॉ. दत्ता केंद्रे (वैद्यकीय अधीक्षक, केज) २. दोन महिला डॉक्टर (तपासणीत दिरंगाई करणाऱ्या) ३. तीन आरोग्य कर्मचारी. या कारवाईनंतर केज उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात बीड आणि अंबाजोगाई येथून पर्यायी डॉक्टरांची फौज केज येथे तैनात केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे रुग्णालयाचा पदभार सोपवला आहे. &आता ‘पाठलाग’चा थेट सवाल: मग केज पोलिसांवर मेहेरबानी का? ​या संपूर्ण प्रकरणात केवळ आरोग्य विभागच नाही, तर केज पोलीस ठाण्याची भूमिकाही मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पीडित मुलीला रुग्णालयात आणण्यापूर्वी आणि कागदपत्रे तयार करताना केज पोलिसांनीही तब्बल ८ तास दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. &​नातेवाईकांचा संतप्त सवाल: “जर आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, तर एका अल्पवयीन पीडितेची तक्रार नोंदवताना आणि तिला रुग्णालयात पाठवताना तास न् तास दिरंगाई करणाऱ्या केज पोलीस ठाण्यातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) नवनीत कावत कधी कारवाई करणार?” &बालहक्क आणि महिला आयोग दखल घेण्याच्या तयारीत! ​सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा एका अल्पवयीन मुलीशी संबंधित आणि अत्यंत संवेदनशील असल्याने राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि राज्य महिला आयोग या प्रकरणाची स्वतःहून (Suo Motu) दखल घेत आहे. आगामी १५ दिवसांत चौकशी समितीचा अंतिम अहवाल येणार असून, दोषी डॉक्टरांची विभागीय चौकशी (Departmental Enquiry) करून त्यांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. ​शासकीय खुर्चीवर एसी केबिन मध्ये बसून गरिबांच्या आणि पीडितांच्या वेदनांची थट्टा करणाऱ्या अशा संवेदन शुन्य आणि मुजोर अधिकाऱ्यांचा ‘पाठलाग न्यूज’ यापुढेही पर्दाफाश करत राहील! ही बातमी लिहीत असताना आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आज (२ जुलै २०२६) या प्रकरणात केवळ आरोग्य विभागावरच नाही, तर निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस प्रशासनावरही अखेर गांभीर्याने कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ​पीडितेच्या नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यातील ज्या कर्मचाऱ्यांवर दिरंगाईचा आरोप केला होता, त्या संदर्भात बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (SP) चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित पोलीस अंमलदाराला प्राथमिक चौकशीसाठी पोलीस मुख्यालयात संलग्न (पूल) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. @पाठलाग’च्या इम्पॅक्टनंतर पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये!& ​आरोग्य विभागाच्या धडक कारवाईनंतर आता पोलीस प्रशासनावरही गांभीर्याने कारवाई सुरू झाली आहे. पीडितेची तक्रार नोंदवताना आणि तिला रुग्णालयात पाठवताना तास न् तास दिरंगाई करणाऱ्या केज पोलीस ठाण्यातील संबंधित कर्मचाऱ्यांची बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (SP) गंभीर दखल घेतली असून, त्यांच्यावरही प्राथमिक विभागीय चौकशीची कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये