ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमरी रस्त्याच्या कामात जाणीवपुर्वक गैरव्यवहार. कामात विकासाचा द्रष्टीकोन नसून, भ्रष्टाचाराचा उद्देश!

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

उमरी रस्त्याच्या कामात जाणीवपुर्वक गैरव्यवहार. कामात विकासाचा द्रष्टीकोन नसून, भ्रष्टाचाराचा उद्देश!

केज / प्रतिनिधी;”महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान” रस्ते विकास प्रकल्पा अंतर्गत करण्यात येत असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याच्या कामात केज नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम उप विभाग केज यांनी मोठा गैरव्यवहार चालवला असून, रस्त्याची रुंदी, कामाचा प्रारंभ , रस्त्याची दिशा व अतिक्रमणातील नियम हे अंदाजपत्रकानुसार काहीच नसल्यामुळे उमरी रस्त्यासाठी मंजुर करण्यात आलेल्या कोट्यावधीच्या बजेटच्या घुगर्या करण्यात येत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहीती अशी की, केज शहरातील उमरी रस्त्याचे काम अनेक दिवसांच्या मागणी व केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनानंतर सुरू असून, या कामात नियम आणि निकषांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, या कामाकडे केज नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र सर्रास दुर्लक्ष जाणवत आहे.उमरी रस्त्याचे काम निकृष्ट व अंदाजपत्रकानुसार होत नसल्याच्या नागरीक तक्रारी करू लागले आहेत..केज शहरात दोन्ही बाजूंनी वसाहत असलेल्या व ३३ फुटाच्या उमरी रस्त्याचे काम चालू असून सुमारे १४ कोटी ६६ लाख ४४ हजार रूपये खर्च करूनही कामाचा दर्जा मात्र निकृष्ठ होऊ लागला असल्याचे स्पष्टझालेआहे.अंदाजपत्रकानुसार ज्या ठिकाणाहून काम सुरू व्हायला पाहिजे तेथून काम सुरू करण्यात आलेले नाही. रस्ते विकास प्रकल्पा अंतर्गत होत असलेले उमरी रस्त्याचे काम हे येडबा रोडे यांचे घर ते खुर्शीदभाई यांच्या प्लॉटपर्यंत नमुद करण्यात आलेले असतांना सदरचे काम येडबा रोडे यांच्या घरापासून सुरू न करता सदाशिव गाडवे यांच्या घरापासून सुरू करण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता येडबा रोडे ते सदाशिव गाडवे यांच्या घरापर्यंत अगोदरच पहिल्या टप्प्यात काम पूर्ण झालेले आहे. विशेष म्हणजे ३३ फुटाचा रस्ता असतांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मोजमाप असल्याचे दिसत आहे. नाल्यांना वळण दिल्या जात असल्याने सदर काम अतिक्रमण विरहित होत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. नाल्यांना वळणे देवून तोंडं बघून अतिक्रमणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असल्याचे समोर आले आहे. सदरचे काम नियमाने,अंदाजपत्रकानुसार आणि गुणवत्तपूर्वक व अतिक्रमणे काढून करावे आणि नगरविकास खात्याने दिलेल्या निधीचा उपयोग नागरिकांच्या विकासासाठी व्हावा अशी मागणी केजकरांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये