ताज्या घडामोडी

खळबळजनक! केज पोलिसांच्या हद्दीत मध्यरात्री ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ८ लाख १४ हजारांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड! “LOTAS 365” ऑनलाईन जुगाराचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; पोलिसांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

खळबळजनक! केज पोलिसांच्या हद्दीत मध्यरात्री ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ८ लाख १४ हजारांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड! “LOTAS 365″ ऑनलाईन जुगाराचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; पोलिसांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई!

​केज/ क्राईम प्रतिनिध : मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीच्या आधारे, दिनांक २५ जून २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या एका मोठ्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकली . ‘LOTAS 365’ नावाच्या ऑनलाईन जुगार ॲप्लिकेशनद्वारे हा अवैध धंदा चालवला जात होता. पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने रचलेल्या या जाळ्यात एकूण ८ आरोपी रंगेहात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ​या धडक कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि जुगार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. केज पोलीस ठाण्यात याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा क्रमांक ३९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत जवळजवळ आठ आरोपीना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. अटक करण्यात आलेली आरोपी ​१. अनंत नवनाथ खंदारे (रा. कारेगव्हाण, बीड) २. अक्षय अनिल गायकवाड (रा. पुणे) ३. अनिल कबीर सानप (रा. बीड) ४. आसाराम बळीराम केकाण (रा. दरडवाडी, केज) ५. गणेश लक्ष्मण खंदारे (रा. कारेगव्हाण) ६. हर्षल मनोहर खंदारे (रा. अमरावती) ७. सुशील दत्तात्रय मुंडे (रा. वडवणी) ८. विशाल उत्तम बारवाळ (रा. छत्रपती संभाजीनगर) ​(या कारवाईत वेगवेगळ्या शहरांतील आरोपी एकत्र येऊन ऑनलाईन रॅकेट चालवत असल्याचे समोर आल्याने या गुन्ह्याची पाळेमुळे खोलवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ​पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान तब्बल ८ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे: ​विविध नामांकित कंपन्यांचे ३४ मोबाईल फोन ​४ दुचाकी वाहने ​इतर ऑनलाईन जुगाराचे साहित्य ​सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ​विशेष पथकातील जाबांज कर्मचारी: ग्रे.पो.उप.नि. अमिरीद्दीन इनामदार, धोंडीराम योगीराज मोरे, राजु वंजारे, विशाल क्षिरसागर, अनिल मंदे, मिसबा इनामदार, मल्लिकाstatusर्जुन माने, जरगर आणि मयुर तकले या कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये