ताज्या घडामोडी
केज पोलिसांची उंबरी येथे जुगारावर मोठी कारवाई; १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांवर गुन्हा दाखल!
पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

केज पोलिसांची उंबरी येथे जुगारावर मोठी कारवाई; १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांवर गुन्हा दाखल!

केज /प्रतिनिधी: केज तालुक्यात अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यांचा धांगडधिंगा चालू असतानाच केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंबरी गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केज पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून एका फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक शोध मोहिमेवर असल्याची माहिती तेज पोलीस ठाण्याचे तत्पर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी पाटलाग न्यूज शी बोलताना दिली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, मौजे उंबरी येथील ‘ओमकार किराणा’ नावाच्या पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम हार-जीतवर ‘तिरंट’ नावाचा जुगार पैशांची बाजी लावून खेळत आहेत. या बातमीच्या आधारे केज पोलिसांच्या पथकाने उंबरी येथील सदर ठिकाणी छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहून तेथे जुगार खेळणाऱ्यांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी घटनास्थळावरून रोकड, जुगाराचे साहित्य आणि वाहने असा एकूण १,२८,२०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या आरोपींवर झाला गुन्हा दाखल: पुलिस कारवाईदरम्यान जुगार खेळताना आढळलेल्या व सहभाग असलेल्या खालील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत: १. अंकुश माणिक जाधव (रा. उंबरी, ता. केज) २. अविनाश गंगाराम गुंडे (रा. उंबरी, ता. केज) ३. प्रदीप दिनकर तांदळे (रा. उंबरी, ता. केज) ४. ज्ञानेश्वर गोकुळ पेटकर (रा. उंबरी, ता. केज) ५. संजयराव मेश्राम मुंडे (रा. उंबरी, ता. केज) ६. नवनाथ तुळशीराम जगदाळे (रा. उंबरी, ता. केज) ७. बाळू विठ्ठल पवार (रा. उंबरी, ता. केज) ८. दिपू बाबासाहेब मस्के (रा. उंबरी, ता. केज) (टीप: यातील आरोपी ‘रावसाहेब अंबादास पेटकर’ (रा. उंबरी) हा कारवाईदरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ व त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील जुगार चालकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.




