ताज्या घडामोडी

बीड पोलिसांचा थरारक पाठलाग! गुन्हेगारांचा पाठलाग करून बीड पोलिसांनी आंतरजिल्हा अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, पांढऱ्या टाटा सुमोसह दोघे जेरबंद.

पाठलाग न्यूज/ प्रतिनिधी:

बीड पोलिसांचा थरारक पाठलाग!

गुन्हेगारांचा पाठलाग करून बीड पोलिसांनी आंतरजिल्हा अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, पांढऱ्या टाटा सुमोसह दोघे जेरबंद.

​बीड: जिल्ह्यात आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पडदाफाश केला आहे. चित्रपटाच्या कथानकालाही शोभेल अशा थरारक पाठलागानंतर पोलिसांच्या पथकाने शेतात लपलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांवर मोठ्या शिताफीने झडप घातली . या कारवाईत चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली असून, वडवणी पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. ​गुप्त बातमीदार अन् फिल्मी स्टाईल चेसळ– ​स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माजलगाव उपविभागात गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की,वडवणी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी मिथुन साळवे आणि रोहन केकान हे आपल्या साथीदारासह पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमो गाडीने लहुळ रोडने पांगरीच्या दिशेने जात आहेत. ​माहिती मिळताच पोउपनिश महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयित गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलिसांची गाडी मागून येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी सुसाट गाडी पळवली. पांग्रूड आणि तेलगाव शिवारात पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. स्वतःला अडकलेले पाहून आरोपींनी गाडी सोडून थेट शेतात पळ काढला; मात्र पोलिसांनीही कसलाही विचार न करता शेतात घुसून थरारक पाठलाग करत दोघांनाही शिताफीने पकडले. ​चोरीचे दोन गुन्हे उघड; टाटा सुमो जप्त– ​ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे खालील प्रमाणे आहेत, ​मिथुन दादाराव साळवे (वय २५, रा. रमाई नगर, वडवणी) ​रोहन कल्याण केकान (वय २५, रा. जुना मोंढा, वडवणी) ​पोलिसांनी दोघांकडे कसून आणि पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, त्यांनी वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मोठ्या चोऱ्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १,००,०००/- रुपये किमतीची टाटा सुमो गाडी (क्र. MH.23 E.6544) जप्त करण्यात आली आहे. ​ही यशस्वी कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, आणि माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पोउपनिश महेश विघ्ने, पोलीस अंमलदार महेश जोगदंड, जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते आणि गणेश मराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ​पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना व जप्त केलेल्या वाहनाला वडवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये