Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज पंचायत समितीचा काळाबाजार: विहीरी मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना सरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

केज पंचायत समितीचा काळाबाजार: विहीरी मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना सरपंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात!

केज: ​धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बीड मध्ये मोठी कारवाई केली असून, केज तालुक्यातील तरणळी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला रंगेहात पकडले आहे. ​महत्त्वाचे तपशील: ​आरोपी: महादेव प्रताप खेडकर (वय ३५), सरपंच – तरणळी, ता. केज यास. ​ ७०,००० रुपये लाच स्विकारताना रंगेहात पकडल्यमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नरेगा अंतर्गत सिंचन विहीर मंजूर करून त्यावर बीडीओ (BDO) आणि इतर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवून देण्यासाठी आरोपीने  लाच मागितली होती. ​ ​ तक्रारदाराने  २३ डिसेंबर २०२५ रोजी अशी तक्रार दिली होती की,  तक्रारदार आणि इतर तिघांच्या शेतात विहीर मंजूर करण्यासाठी प्रत्येकी २५ हजार या प्रमाणे १ लाख रुपयांची मागणी केज तालुक्यातील तरनळीचे सरपंच यानी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांच्या पडताळणीत सखोल चौकशीनंतर असे निष्पन्न झाले की, सरपंचाने स्वतःच्या सहीसाठी १० हजार आणि बीडीओ व इतर अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी उर्वरित तिघांकडून प्रत्येकी २० हजार, अशी एकूण ७० हजार रुपयांची मागणी केली. एसीबीच्या सापळ्याचा १ जानेवारी २०२६ रोजी पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, अखेर १३ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी सायंकाळी ७० हजार रुपये घेताना सरपंचाला ताब्यात घेण्यात आले.तक्रारदाराने 23 डिसेंबर 2025 रोजी तक्रार दिली होती. या प्रकरणातील तक्रारदार व अन्य तिघांच्या शेतजमिनीत एमआरईजीएस योजनेंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये, असा एकूण 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात सरपंच खेडकर यांनी विहिरीच्या प्रस्तावावर सही करून बीडीओ व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार व उर्वरित तिघांकडून प्रत्येकी 20 हजार रुपये, असा एकूण 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.1 जानेवारी 2026 रोजी पहिली सापळा कारवाई करण्यात आली असता आरोपीने थेट रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर 13 जानेवारी 2026 रोजी केज पंचायत समितीच्या पाठीमागील खेडकर यांच्या रूममध्ये सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 70 हजार रुपये स्वीकारताना तरनळीच्या सरपंचला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद पोलिस निरीक्षक विजय हनुमंत वगरे यांनी दाखल केली असून पुढील तपास बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे करत आहेत. ​ ही घटना केज पंचायत समिती स्तरावर ‘नरेगा’ सारख्या कल्याणकारी योजनांमध्ये कशा प्रकारे आर्थिक देवाणघेवाण आणि एजंटगिरी चालते, हे अधोरेखित करते. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या नावाखाली लाच मागितली गेल्याने या प्रकरणाचे धागेदोरे वरपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये