वरपगाव येथे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ‘शिवमहापुराण कथा’ सोहळ्याचे आयोजन.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

वरपगाव येथे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह’ व ‘शिवमहापुराण कथा’ सोहळ्याचे आयोजन.
केज/प्रतिनिधी: श्रीक्षेत्र साधु शिवरामपुरी मठ संस्थान, वरपगाव येथे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील तमाम भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजका तर्फे करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ह.भ.प. व्याकरणाचार्य तुकाराम महाराज शास्त्री (लिंबगाव) यांच्या सुमधुर वाणीतून ‘शिवमहापुराण कथा’ संपन्न होणार आहे. तसेच दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होतील. कीर्तन सेवा देणारे नामवंत महाराज खालील प्रमाणे आपली कीर्तन सेवा देतील.३१ जानेः ह.भ.प. माधव महाराज ढाकणे (आळंदी).१ फेब्रुः ह.भ.प. महंत श्रीराम महाराज विडेकर.२ फेब्रुः ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेगडे (नेकनूर).३ फेब्रुः ह.भ.प. भागवत महाराज बादाडे.४ फेब्रुः ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे (बारामती).५ फेब्रुः ह.भ.प. पांडुरंग महाराज शिरसागर (आळंदी).६ फेब्रुः ह.भ.प. संदिपान महाराज हासेगावकर. ७ फेब्रु (काल्याचे कीर्तन): मठाधिपती ह.भ.प. भगवान महाराज शास्त्री वरपगावकर. या सप्ताह मध्ये दैनंदिन उपक्रम खालील प्रमाणे आयोजित केलेले आहेत. सप्ताहात पहाटे ४ वाजल्यापासून काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मठाधिपती महंत भगवान महाराज शास्त्री व वरपगाव ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना या मंगल सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ७ फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.



