केज तालुक्यातील देवगांव येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोशात साजरी.
केज:केज तालुक्यातील देवगांव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडर यांची १३३ वी जयंती मंगळवार दि.३० एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष डॉ.शरद गायकवाड,आरुण कांबळे,धनराज गायकवाड,बंटी कांबळे,संदिप कांबळे,बापू गायकवाड यांनी परिश्रम घेऊन ही जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली.
केज तालुक्यातील देवगांव येथे दि.३० एप्रिल मंगळवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे आयोजण करण्यात आले होते. सकाळच्या पहील्या सत्रात सकाळी दहा वाजता समाज मंदीरामध्ये पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत (बापू) मुंडे,छंदर मुरकुटे,महादेव ढाकणे, चेरमण बापूसाहेब मुंडे,जगन्नाथ मुरकुटे यांच्यासह गावातील प्रमुख नागरीकांच्या हस्ते ध्वजारोहण करून तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले ,त्या नंतर बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर, दुसऱ्या सत्रात सांयकाळी सहा वाजता जि.प.सदस्य विजयकांत मुंडे व नांदेड-हिंगोलीच्या शिवसेनेच्या.म.संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला शिवदास मुंडे,पत्रकार विनोद ढोबळे यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावातील नागरीक,तरुण युवक व महीला, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुक संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या सत्रात समाज मंदीर या ठीकाणी भाषणांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदे शिवसेना गटाच्या नांदेड-हिंगोलीच्या महिला संपर्कप्रमुख सौ.रत्नमाला मुंडे,तर प्रमुख पाव्हुणे म्हणून जेष्ठ विधिज्ञ अॅड.नवनाथ मुंडे,वंचितचे कार्यकर्ते शर्मल साहेब,ग्रा.प.सदस्य तात्यासाहेब मुंडे,वैजेनाथ मुंडे,दुकानदार रामराव मुंडे,सह गावातील प्रमुख मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. या उपस्थित मंडळींचा जयंती कमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना रत्नमाला मुंडे व अॅड.नवनाथ मुंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश सानप यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंतीचे अध्यक्ष डॉ.शरद गायकवाड,आरुण कांबळे,गब्बर गायकवाड फौजी,राजेंद्र कांबळे,अभिनव गायकवाड,प्रज्वलीत गायकवाड,साहिल गायकवाड, अजय कांबळे,संतोष कांबळे,बाळु कांबळे,बापु गायकवाड,चिवळा गायकवाड, राणू कांबळे,बाळा वाघमारे,बंडू कांबळे,बुध्दभूषण गायकवाड,संदिप कांबळे,अर्जुन गायकवाड,दत्ता गायकवाड,विजय कांबळे,नारायण गायकवाड,दैवान कांबळे,अनिल कांबळे सह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार महादेव गायकवाड यांनी केले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.