ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र रामकृष्णगड येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

श्री क्षेत्र रामकृष्णगड येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

​केज /प्रतिनिधी: केज तालुक्यातील सारोळा परिसरातील श्री क्षेत्र रामकृष्णगड (बरड), ता. केज येथे ‘श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना’निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी हा सोहळा उत्साहात पार पडणार असून, यामध्ये लघुरुद्राभिषेक, अलंकार पूजा आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा च्या निमित्ताने ​स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाचे अवचित्य साधून सकाळी सूर्योदयासोबतच धार्मिक विधींना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने ​लघुरुद्राभिषेक व अलंकार पूजा: विधीवत पूजा आणि आरती. मा. श्री. विक्रम (बप्पा) मुंडे (पाटील) व सौ. कृष्णाआई विक्रम मुंडे आणि मा. श्री. चंद्रकांत गोविंदराव कुलकर्णी व सौ. कांचन चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सपत्नीक पूजा संपन्न होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री. गंगाधर यादव महाराज (कोरडेवाडीकर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपल्याबरोबर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या कार्यक्रमासाठी आणि ​या मंगलमयी प्रसंगी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज बरडकर, ह.भ.प. रतन महाराज सासुरेकर, ह.भ.प. तुकाराम महाराज लाड आणि ह.भ.प. अनिरुद्ध महाराज मुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती व शुभआशिर्वाद लाभणार आहेत. ​या कार्यक्रमाचे आयोजन मा. श्री. विजयकांत भैया मुंडे (सदस्य, जि. प. तथा चेअरमन कृष्णा अर्बन बँक केज) आणि मा. श्री. अतुलदादा मुंडे (सचिव, वि. शि. प्र. म. तथा सरपंच देवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच गुरुनानक विद्यामंदिर बीडचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी वृंद आणि परिसरातील ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे ​स्थळ: श्री क्षेत्र रामकृष्णगड (बरड), ता. केज, जि. बीड. हे असून, परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी आणि भाविक मंडळींनी या आध्यात्मिक सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आपले विनीत’ व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये