केज अंबाजोगाई विधानसभा परिक्षेत्राच्या माजीआमदार संगीताताई ठोंबरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार.
प्रतिनिधी । केज: केज विधानसभा राखीव मतदार संघातून माजी आमदार संगीताताई ठोंबरे आज मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संगीताताई ठोंबरे यांची मोठ्या शक्ती प्रदर्शनाने केज शहरातून पदयात्रा काढली जाणार आहे. माजी आमदार संगीताताई ठोंबरे सोमवारी दुपारी १२ वाजता केज तहसील कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी शहरातील भवानी चौक, डा. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसीलकार्यालय केज अशी भव्य पदयात्रा सकाळी ११ वाजता निघणार आहे.. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व पुढील रणनीती आखणारआहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व निवडणुक आम्हीच जिंकू असा विश्वास संगीता ताई ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.