क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई आणि ठाण्याचे शिक्षणाधिकारी बदलापूर अत्याचार प्रकरणातील कर्तव्यकसूर कारणाने निलंबित. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.

पाठलाग न्युज/क्राईम प्रतिनिधी:

मुंबई आणि ठाण्याचे शिक्षणाधिकारी बदलापूर अत्याचार प्रकरणातील कर्तव्यकसूर कारणाने निलंबित. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा.

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला ताबडतोब न कळवल्याबद्दल ठाण्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केल्याबद्दल शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर येथील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद समाजात उमटलेले असताना राज्य सरकारनेही आता या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत. दीपक केसरकर यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी पालिकेशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात पालिका शाळेत सीसी टीव्ही लावण्याच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याबाबत केसरकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे घोषित केली. त्याचबरोबर ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचेही निलंबन करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये