आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केज येथील योगिता बाल रुग्णालयात ११ दिवसांच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी. सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन!!!

पाठलाग न्युज/विशेष प्रतिनिधि:

केज येथील योगिता बाल रुग्णालयात ११ दिवसांच्या बाळावर आतड्याच्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी.

सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन!!!

प्रतिनिधी/ बीड:सर्वच क्षेत्रात विकासात्मक द्रष्टीकोनातून मागे असलेल्या केज येथील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालयाने मात्र आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती केल्याची अनेक ऑपरेटिव्ह उदाहरणे घडवलेली असतांनाच केवळ १२ दिवसांच्या बच्चुवर पचन संस्थेतील आतड्याच्या गुंतागुंतीची रिस्की व मोठी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून बाळाला जीवनदान देण्यात योगिता बालरुग्नालयाचे प्रमुख डॉ. दिनकर राऊत व त्यांचे सहकारी डाॅक्टर्स आणि हाॅस्पिटल स्टाफ यशस्वी झाल्यामुळे केज येथील योगिता बालरुग्नालयाची विश्वासार्हता द्रढ झाली आहे.केज सारख्या ग्रामीण व कुठल्याही आरोग्याच्या सुविधा नसलेल्या दुर्गम भागात वैद्यकीय क्षेत्रात आव्हान असलेली अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडून यशस्वी केल्याबद्दल डॉ. दिनकर राऊत व त्यांच्या सहकान्यांचे सर्वस्तरातील अनेकांनी अभिनंदन केले आहे. केज तालुक्यातील रामवडगाव या गावातील एका महिलेची नॉर्मल प्रसुती अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व श्त्री रोग निदान विभागत झाली होती. प्रसुती नंतर बाळ व बाळांतीन माता सुखरुप असल्याने त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र बाळाच्या जन्मानंतर पाच-सहा दिवसांनी त्याला अपचन व उल्टीचा त्रास सुरु झाला. हा त्रास सुरु झाल्यानंतर बाळाच्या पालकांनी कळंब येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले, मात्र बाळाचा आजार विकोपाला गेला.कळंब येथील डाॅक्टरानी तात्काळ केज येथील योगिता बालरुग्नालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ दिनकर राऊत यांना संपर्क करुन १० दिवसाचे बाळाला त्या बाळाला उपचारासाठी केज येथील बोगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाचा आजार व लक्षणे व्यवस्थित समजावून घेतली. आजारांचे गांभिर्य व विविध शक्यतांचे निरसन करण्यासाठी डॉ. दिनकर राऊत यांनी बाळाच्या विविध तपासण्या करुन घेतल्याअसता त्यांना बाळाच्या पचनसंस्थेतील मोठे अताडे व लहान अताडे यांची कमी-अधिक वाढ व त्यामधील बिघाड चिकित्सकपणे जाणून घेतला. त्यांनी पचनसंस्थेचा महत्वाचा भाग असलेल्या आतड्यांची सोनोग्राफी करण्यास सांगितले. सदरील सोनोग्राफी अंबाजोगाई येथील डॉ. नितीन पोतदार यांचे कडे करण्यास सांगून डॉ पोतदार यांनी सोनोग्राफी रिपोर्ट नुसार बाळाच्या आजाराची लक्षणे व साभाव्य शक्यता सांगितल्या, डॉ. पोतदार यांनी सोनोग्राफी करताना सुक्ष्म अभ्यास करून आतड्याच्या गुंतागुंतीचे योग्य निरीक्षण केले व सविस्तर अहवाल डॉ. दिनकर राऊत यांचे कडे पाठवला.११ दिवसांच्या बाळाच्या आतड्यातील संशयास्पद गुंतागुंतीची खात्री झाल्यावर ही अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय डॉ. राऊत यांनी घेतला. बाळाच्या आई-वडिलांना या बाबत सविस्तर माहीती दिल्यानंतर बाळाच्या आईवडीलानी देखील ही शस्त्रक्रिया याच रुग्णालयात करण्याचा आग्रह डॉ. राऊत यांच्या कडे धरला. डॉ. दिनकर राऊत यांनी ही अवघड व रिस्की शस्त्रक्रिया करण्याची निर्णय घेऊन सदरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

डॉ. दिनकर राऊत एक उत्तम बालरोग तज्ञ ! केज येथील योगिता नर्सिंग होम व बाल रुग्णालया चे प्रमुख डॉ. दिनकर राऊत हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आहेत. यापुर्वी ही त्यांनी लहान मुलांवरील अनेक अवघड शस्रक्रिया केज सारख्या मागास भागात असलेल्या आपल्या खाजगी रुग्णालयात यशस्वीपणे पार पाडून अनेक बालकांना जिवन दिलेले आहे. बालरोगावरील विविध राज्य व देशपातळीवर परीक्षांमध्ये त्यांनी आपले प्रबंध सादर केले आहेत. डाॅ.दिनकर राऊत यांच्या सुविद्य पत्नी डाॅ.हेमा राऊत या गायनिक आहेत तर,दिनकर राऊत हे बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे बाळाच्या जन्मापुर्वीची देखभाल डाॅ.हेमाताईंकडे आणि जन्मानंतरची देखभाल डाॅ.दिनकर राऊत यांचेकडे असल्यामुळे या भागात “योगिता नर्सिंग होम & पेडियाट्रिक क्रिटिकल सेंटर” या भागात चांगलेच सुप्रसिद्ध आहे. डाॅ.दिनकर राऊत यांनी “बालकांचा जीवनदाता” म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.अतड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केज सारख्या वैद्यकीय क्षेत्रात अविकसित असलेल्या भागातील रुग्णालयात यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या सोनोग्राफी चा अहवाल संभाजी नगर येथील प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक डॉ. रामदास यांचे कडे पाठऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. बाळाला वाचवण्यासाठी एक हाडाचा डाॅक्टर या न्यायाने धावा-धाव करत ११ दिवसांच्या बाळावर शत्रक्रिया करण्याचा तातडीने निर्णय घेतला आणि सदरची शस्त्रक्रिया यशस्वी करुण्यासाठी डॉ. दिनकर राऊत यांनी, डॉ. रामदास व लातुर येथील बालरोग तज्ञ डॉ. सागर, एनआयसीयू चा सर्व स्टाफ, सहकारी ,परिचारीका मंगल जाधव, एनआयसीयू चा “बॅकबोन” बाळू व इतर स्टाफ चे मोलाचे सहकार्य घेऊन प्रस्तुत बाळाला जीवनदान दिले. ११ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याच्या आहाराचे व औषधांचे योग्य नियोजन लावून बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बाळाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या जन्मदात्यांसह सर्वच स्थरातून “योगिता नर्सिंग होम &पेडियाट्रिक क्रिटिकल केअर हाॅस्पिटल “चे अभिनंदन होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये