क्राईम न्युजमहाराष्ट्र

केज शहरात देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला ताब्यात घेवुन सात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल.

पाठलाग न्युज/क्राईम प्रतिनिधि:

केज पोलीसांची धाडसी कारवाई!

केज शहरात देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला ताब्यात घेवुन सात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल.

केज: स्थानिकच्या दलालांची मदत घेऊन मुंबई व इतर राज्यातील सराईत दरोडेखोरांचे बीड जिल्ह्य़ात अगमन होत असून, अशाच मुंबई व परराज्यातील एका खतरनाक व शस्त्रधारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, केज उपविभागाचे पोलीस उपाधिक्षक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई केल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.याबाबतची सविस्तर माहीती अशी की, दिनांक 20/02/2024 रोजी केज चे सहायक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली की, गुन्हेगारी प्रवृत्ती चे काही इसम हे हमरस्त्यावर लुटमार करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई कडुन नेकनूर कडे एका पांढऱ्या रंगाच्या सुझुकी कंपनीची ईरिटींगा चारचाकी गाडी क्रमांक MH-46-CM-1934 मध्ये बसून बीड कडे निघाले असल्याची माहीती मिळाल्याबरोबर तातडीने त्यांनी त्यांच्या कार्यालयातील पो.ना विकास चोपने, पो.ना अनिल मंदे, पो.ना./दिलीप गित्ते, पो.काॅ.अशपाक ईनामदार, पो.हे.काॅ.मुंबे तसेच पोलीस स्टेशन केज येथील पोउपनि शिंदे , पो.काॅ./शहादेव म्हेत्रे, पो.काॅ.महादेव बहिरवाळ, पो.काॅ.प्रकाश मुंडे यांना विलंब न लावता आपल्या सोबत घेवुन केज शहरामधून केज ते अंबाजोगाई रोडवरील तांबवेश्वर मेडीलक समोर रोडवर सापळा लावला. अंबाजोगाई कडुन येणाऱ्या पांढऱ्या रंगाची ईरिटीगा गाडी क्रमांक MH-46-CM-1934 हिस आडवून गाडीतील सर्व इसमांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन केज येथे आणून सदर इसमांची व गाडीची झडती घेतली असता सदर इसमांच्या ताब्यातील एक देशी बनावटीचा खावटी कट्टा, पाच जिवंत काडतुस, एक रिकामी मॅग्झीन व गाडीमध्ये मध्यल्या शिटखाली एक लोखंडी रॉड, डिक्कीमध्ये एक लोखंडी रॉड, एक लोखंडी स्क्रू ड्राव्हर व एक लाकडी दांडका मिळुन आल्याने प्रस्तुत साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे 01) गणेश पांडुरंग भोसले, रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड, 02) हरीष तोमर देवडीगा, रा. बजेगली ता. कारकला जि, उडपी; राज्य कर्नाटक ह. मु. डोंबीवली, मुंबई जि. मुंबई, 03) नारायण मंगळा करण, रा. महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी; राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई, 04) श्रीनिवास आशाअली बारगम, रा. संत ज्ञानेश्वर नगर, गर्व्हमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई, 05) श्रावण शिवाजी गायकवाड, रा. बोरीवली मुंबई, 06) दिपक दशरथ चाटे ऊर्फ ताठे,रा. धर्मनाका कामगार नगर-2 मुंबई, 07) नामदेव परसु पोवार, रा. कामोठा नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड आरोपितांची अशी नावे असुन, सदरच्या एकून 07 आरोपी विरुध्द पो.ना.विकास चोपने यांच्या फिर्यादी वरुन केज पोलीस स्टेशन येथे कलम 399 भादविसह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पांडुरंग भोसले यासह इतर आरोपीवर सुध्दा अंबाजोगाई, मुंबई, ठाणे शहरामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली असून, सदरची कारवाई बीड चे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर , अंबाजोगाई चे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना , पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत महाजन,केज चे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, भुंबे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री, कमलेश मीना साहेब व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत. केज पोलिसांच्या या कारवाईमुळे केज पोलिसांचे सर्व स्थरातून आभिनंदन होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये