Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात संघर्ष आणि एकतेचे विराट दर्शन. राज्याचे माजी कृषी मंत्रीआ. धनंजय मुंडे यांची भावनिक साद!
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :




मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास आपली उपस्थिती लावून आपले भावनिक मनोगत व्यक्त केले.आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले. माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात मी कधीच जात पाहून काम केले नाही, कधी करायची तशी वेळही येणार नाही, अशी शिकवणच मला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व माझे वडील स्व. पंडित अण्णा यांच्याकडून मिळालेली आहे. स्व. मुंडे साहेबांचा संघर्ष मी अत्यंत जवळून पाहिला व अनुभवलेला आहे. त्यामुळे संघर्ष आमच्या रक्तात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये माझा काहीही संबंध नाही, अशा विषयांवरून सलग 200 दिवस आमची मीडिया ट्रायल केली गेली, मात्र मी शांत राहून व संयम बाळगून प्रत्युत्तर दिले नाही. कुणा एकाचा दोष असेल त्याला नक्कीच शिक्षा मिळावी, मात्र त्याडून काहींनी आमच्या संपूर्ण कुटुंबांची, आई, मुले-बाळे यांची, सबंध जातीची, जिल्ह्याची आणि जिल्ह्याच्या मातीची बदनामी केली. त्या सर्व गोष्टींना संयमाने तोंड दिले. जात म्हणून कुणी द्वेष करत असेल त्याला द्वेषाने उत्तर देणार नाही, आपल्या समाजाचा नक्कीच अभिमान बाळगू, मात्र इतर कुठल्याच समाजाचा द्वेष करणार नाही, असे आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री, आदरणीय डॉ. तात्याराव लहाने हे होते. आयोजकांनी पुणे, मुंबई सह मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची, अभ्यासिकेची सोय व्हावी, सामाजिक सभागृह असावे, अशा विविध मागण्या केल्या. त्या सर्वजण मिळून पूर्ण करू, असा विश्वासही व्यक्त केला.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.