गंगा माऊली शुगर मुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ; आमचे स्वप्न साकार झाले– खा रजनीताई पाटील.
गंगा माऊली शुगरचा चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ.
केज दि.२४ – विखे पाटील कारखाना लक्ष्मणराव मोरे यांच्याकडे हस्तांतरित केल्यानंतर आम्हाला आमच्या मनातील दिवस पाहायला मिळाले याचे समाधान असून चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांचे उत्कृष्ट नियोजन लाभल्याने अल्पावधीतच गंगा माऊली कारखाना नावारुपाला आला आहे. आपणही सर्वांनी कारखान्याला सहकार्य करून कारखान्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार रजनी पाटील यांनी केले. त्या गंगा माऊली शुगरच्या चौथ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. मागच्या तीन वर्षांपासून विक्रमी गाळप करणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे वेळेवर देणाऱ्या गंगा माऊली शुगरच्या चौथ्या गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. गंगा माऊली शुगरच्या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविकिरण इंगळे दांपत्याच्या हस्ते पूजा करून करण्यात आला. सदरील कार्यक्रमासाठी खासदार रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, बप्पासाहेब जाधव, किरण पाटील, लक्ष्मण मेंगडे महाराज, अर्जुन लाड महाराज, सोलापूरच्या महापौर अलका राठोड, हनुमंत मोरे, राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, अमित पाटील, उपजिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, बप्पासाहेब ईखे, नवनाथ थोटे, तहसिल सुधीर सोनवणे, संचालक अविनाश मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.आय. मुजावर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खा.रजनीताई पाटील यांनी कारखाना चालवताना जो संघर्ष करावा लागला त्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.तर यावेळी राहुल सोनावने यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगत राहुल सोनवणे हे आता एक महत्वाची लढाई लढणार आहेत त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी बोलताना सांगितले की, अनेक जण कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र आम्ही लक्ष्मण मोरे यांच्या हातात कारखाना दिल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. अनेक जण अपप्रचारही करत होते. मात्र शेतकऱ्यांच्या विश्वासावर कारखाना दिमाखात सुरू झाला असून यामध्ये कित्येकांनी आर्थिक अडवणूक करण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. तसेच कुठलाही कारखाना कुशल कामगारांवर चालत असतो. त्यामुळे गंगा माऊली शुगर उत्तरोत्तर प्रगती करत असल्याने आमचे सर्व स्वप्न पूर्ण होताना दिसत आहेत. हा कारखाना उच्चांकी भाव देण्याचा विक्रम करेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कार्यकारी संचालक प्रवीण मोरे सांगितले की, गंगा माऊली शुगरने टनामागे एफआरपी पेक्षा शंभर रुपये जास्त दिले असून डिस्टलरी प्रकल्प उभारणीचे कामही सुरू आहे. रजनीताई आणि दादांचा विश्वास तर लाभलाच मात्र सूत्र जुळवण्यासाठी राहुल सोनवणे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत लवकरच एआय तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत.तर यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी बोलताना सांगितले की, या परिसरातील एक साखर कारखाना उभा राहावा यासाठी खासदार रजनीताई पाटील आणि अशोक पाटलांनी ३३ वर्षांपूर्वी स्वप्न बघितले होते. आणि आता योग्य माणसांच्या हातात कारखाना दिला असून चेअरमन लक्ष्मण मोरे हे लातूर पॅटर्नचे जनक आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हेच आमचे ब्रीदवाक्य असून त्याप्रमाणे आम्ही कारखाना चालवत आहोत. अनेक जणांना याबद्दल शंका होती मात्र आपण पाहताय कारखान्याचा उत्कर्ष दिवसेंदिवस होत आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी उसाची चिंता न करता नोंदणी प्रमाणे ऊस गाळपाची सर्वस्वी जिम्मेदारी आम्ही घेतली असून सर्वात जास्त भाव देणारा कारखाना म्हणून गंगा माऊली शुगर पुढे येत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनीही गंगा माऊलीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरात विकासाची गंगा पोहोचली असल्याचे सांगत मराठवाड्यात उसाचा भाव काय असावा हे गंगा माऊली ठरवेल असे मत व्यक्त केले. तर आदित्य पाटील यांनी कारखान्याला पुनर्जीवित करण्याचा पाटील दाम्पत्याने निर्धार करून लक्ष्मणराव मोरे यांच्याकडे कारखाना सुपूर्द केला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येत आहे. आम्ही आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि यात राजकारणही करणार नाही, त्यामुळे आपल्याला भयमुक्त कारखानदारी नक्कीच जाणवेल असा विश्वास बोलून दाखवला. तर कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी बोलताना सांगितले की, तीन वर्षे गाळप यशस्वीपणे पूर्ण केले असून सर्वांचे पेमेंटही वेळेवर दिले आहे. पंधरा दिवसात पेमेंट देण्याचा पायंडा गंगा माऊली शुगरने पाडल्याने शेतकऱ्यांना कारखान्याकडे पैशासाठी चकरा मारण्याची गरज भासलेली नाही. शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकरी मेळावे घेतले, लागवडी बाबत मार्गदर्शन केले आणि एवढेच नव्हे आम्ही एआय तंत्रज्ञान वापरून कारखाना परिसरात शेतीचा प्रयोग करणार आहोत मात्र त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. वेळेवर पेमेंट देऊन आणि शेतकऱ्यांची उत्पादन वाढवून शेतकऱ्यांची कधीच हेळसांड होऊ देणार नाही. आणि एवढेच नव्हे तर उसाला भाव देण्याची आपल्याशी कुणीही स्पर्धा करू शकणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आमच्या माध्यमातून कारखाना सुरू होण्याचे खरे श्रेय राहुल सोनवणे यांचे आहे. त्यामुळे भावाची चिंता करू नये असा विश्वास दिला. यावेळी ऊस उत्पादनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या, वाहतुकीमध्ये अतिशय चोख कामगिरी बजावलेल्या तसेच ऊसतोड कामगारांमध्ये ही असाधारण कार्य केलेल्या सर्व घटकांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये उदयसिंह दिख्खत, काशिनाथ राऊत, माणिक काळे, एजाज मसूद शेख, धनंजय आदनाक, रामदास आडे, शिवाजी राठोड, प्रमोद चौरे, कैलास घुले, संतोष घुले यांचा सन्मान यावेळी करण्यातआला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर तर आभार मुजावर शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.