Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डॉ संपदा मुंडे प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाहीची सर्व स्तरातून मागणी. केज येथेही आज झाला रस्ता रोको.
पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

डॉ संपदा मुंडे प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाहीची सर्व स्तरातून मागणी.
केज येथेही आज झाला रस्ता रोको.
केजः: सातारा फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संपदा मुंडेंची आत्महत्या ही नीतिमूल्ये हरवलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रदर्शन असून सामान्य कुटुंबातील या उच्च शिक्षित डॉक्टर तरुणीची आत्महत्या समाजाला चिंतेत टाकणारी व भयभीत करणारी आहे. साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर असलेली डॉ. संपदा श्रीकिसन मुंडे (वय 30, रा. कोटरबन ता. वडवणी, जि. बीड) यांनी फलटण येथील नामांकित हॉटेल “मधुदीप”मधील खोलीत मध्यरात्री आत्महत्या केली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. डॉ. संपदा यांनी आपल्या तळ हातावर बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. आणि प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. त्यामुळे मी जीव देत आहे, असं लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा शेवट केला.
इतकेच काय तर संबंधित महिला डॉक्टरवर वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात होता अशा प्रकारची डॉक्टर संपदा मुंडे हीने केलेली तक्रार उघडकीस आली असून,यासाठी फलटणमधील एका खासदाराचे दोन पीए सातत्याने महिला डॉक्टर संपदा मुंडेवर दबाव टाकत होते, याबाबतची माहिती एका पत्रातून समोर आली आहे.




