Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात संघर्ष आणि एकतेचे विराट दर्शन. राज्याचे माजी कृषी मंत्रीआ. धनंजय मुंडे यांची भावनिक साद!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात संघर्ष आणि एकतेचे विराट दर्शन.

राज्याचे माजी कृषी मंत्रीआ. धनंजय मुंडे यांची भावनिक साद!

ठाणे: समाजाचे दिवंगत नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक दृष्ट्या विस्थापित व पांगलेला वंजारी समाज पुन्हा एकदा एकजुट व एकसंघ असल्याचे दाखवून देण्यासाठी ठाणे येथे बोलावण्यात आलेल्या वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात संघर्ष आणि एकतेचे विराट दर्शन दिसून आले असून,प्रस्तुत अधिवेशनाला राज्यभरातून समाजाचे प्रतिनिधी आजी-माजी आमदार,आजी-माजी खासदार व प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येनेउपस्थित होते.या अधिवेशनात राज्याचे माजी कृषिमंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास आपली उपस्थिती लावून आपले भावनिक मनोगत व्यक्त केले.आज ठाणे येथे आयोजित वंजारी समाज अधिवेशन, विचार मंथन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून संबोधित केले. माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात मी कधीच जात पाहून काम केले नाही, कधी करायची तशी वेळही येणार नाही, अशी शिकवणच मला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब व माझे वडील स्व. पंडित अण्णा यांच्याकडून मिळालेली आहे. स्व. मुंडे साहेबांचा संघर्ष मी अत्यंत जवळून पाहिला व अनुभवलेला आहे. त्यामुळे संघर्ष आमच्या रक्तात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये माझा काहीही संबंध नाही, अशा विषयांवरून सलग 200 दिवस आमची मीडिया ट्रायल केली गेली, मात्र मी शांत राहून व संयम बाळगून प्रत्युत्तर दिले नाही. कुणा एकाचा दोष असेल त्याला नक्कीच शिक्षा मिळावी, मात्र त्याडून काहींनी आमच्या संपूर्ण कुटुंबांची, आई, मुले-बाळे यांची, सबंध जातीची, जिल्ह्याची आणि जिल्ह्याच्या मातीची बदनामी केली. त्या सर्व गोष्टींना संयमाने तोंड दिले. जात म्हणून कुणी द्वेष करत असेल त्याला द्वेषाने उत्तर देणार नाही, आपल्या समाजाचा नक्कीच अभिमान बाळगू, मात्र इतर कुठल्याच समाजाचा द्वेष करणार नाही, असे आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री, आदरणीय डॉ. तात्याराव लहाने हे होते. आयोजकांनी पुणे, मुंबई सह मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची, अभ्यासिकेची सोय व्हावी, सामाजिक सभागृह असावे, अशा विविध मागण्या केल्या. त्या सर्वजण मिळून पूर्ण करू, असा विश्वासही व्यक्त केला.

मागील काही महिन्यात अनेक आघात, आरोप आणि बदनामी सहन केली मात्र आमच्या अस्मिता आणि गुणवत्तेवर आक्षेप घेणाऱ्यांचे चुकीचे आरोप यापुढे सहन करणार नाही! याप्रसंगी प्रशासकीय सेवेत प्रधान सचिव म्हणून उत्तम कामगिरी केलेले निवृत्त सचिव श्री. सुमंत भांगे साहेब यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना आम्ही दोघांनी एकत्र काम केलेले आहे. त्याचबरोबर श्री. अशोकराव मोराळे, श्री. रणजित ढाकणे, श्री माधवराव नागरगोजे, सांप्रदायिक क्षेत्रातील ह. भ. प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, शिक्षण क्षेत्रातील साठे कोचिंग क्लासेसचे संचालक श्री. फुलचंद साठे, व्याख्याते व करिअर मार्गदर्शक श्री. विठ्ठल कांगणे गुरुजी, श्री. मानवेंद्र केंद्रे, प्रशासकीय सेवेतील भा. प्र. से. श्रीमती कश्मीरा संख्ये, एमपीएससी टॉपर उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर, ऊसतोड कामगार कुटुंबातून पोलीस उपाधीक्षक बनलेले संतोष खाडे, भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट प्रवीण सांगळे, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. उज्वला दहिफळे, डॉ. शालिनीताई कराड, डॉ. गणेश राख, डॉ. प्रवीण बांगर, डॉ. स्वप्नांजली आव्हाड, डॉ. शितल चोले, उद्योग क्षेत्रातील श्री. लिंबा शेठ नागरगोजे, श्री. भरत गित्ते, श्री. प्रसाद कातकडे, श्री. गजानन आंधळे, श्री. बाबासाहेब गर्जे, क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटर चि. सचिन धस, एव्हरेस्ट सर करणाऱ्या स्मिताताई घुगे, कबड्डी पटू कु. साक्षी बांगर, साहित्य क्षेत्रातून सौ. अलकनंदा घुगे, गणेश खाडे, प्रवीण गित्ते, पत्रकारिता क्षेत्रातून श्री. विलास बडे, श्री. वसंत मुंडे, श्री. सागर आव्हाड, श्री. विशाल बडे, श्री. आश्विन महाजन, श्री. सचिन बडे, सांस्कृतिक क्षेत्रातील श्रद्धाताई गित्ते, शुभांगीताई केदार, महेशकुमार वणवे, सुजित चौरे यांसह विविध गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या राज्यस्तरीय अधिवेशनाचे संपूर्ण नियोजन अखिल भारतीय युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनराज गुट्टे यांनी केले होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये