ग्रामीण वार्ता

देवगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.अॅड. एन.एम.मुंडे यांनी तरुणांसमोर कथन केला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श जीवनपट.

पाठलाग न्युज/प्रतिनिधी:

देवगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.अॅड. एन.एम.मुंडे यांनी तरुणांसमोर कथन केला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श जीवनपट.

केज:- तालुक्यातील देवगांव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती रविवार दि. ३० एप्रिल रोजी संपन्न झाली असून,अँड. एन.एम.मुंडे यांनी आपल्या भाषणातुन मिरवणूक, डिजे व जंयती उत्सवात झिंगणार्या तरुणाईसमोर डाॅ. बाबासाहेबांचा आदर्श जीवनपट कथन करुन आजच्या तरुणांना जागृत केले.दरम्यान, देवगाव येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देवगाव येथील रहिवासी असलेल्या नांदेड-हिंगोली च्या महिला संपर्कप्रमुख सौ. रत्नमाला मुंडे या उपस्थित होत्या तर,या भागाचे युवानेते तथा बीड जि.प.चे सदस्य विजयकांत मुंडे यांची उपस्थिती होती. जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड, आरुण कांबळे, गब्बर गायकवाड फौजी, बंटी कांबळे यांनी परिश्रम घेऊन ही जयती मोठ्या उत्साहात साजरी केली. सकाळी दहा वाजता समाज मंदीर येथे सरपंच रुपालीताई मुंडे, भाजपाचे जेष्ठ नेते रमाकांत (बापू) मुंडे, अतुल मुंडे, आश्रुबा मुरकुटे फौजी यांच्यासह गावातील नागरीकांच्या हस्ते ध्वजारोहण करून तथागत गौतम बुध्दांच्या व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेच पुजन व बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर सांयकाळी सहा वाजता जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यामिरवणुकीमध्ये गावातील नागरीक, तरुण युवक व महीला, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुक संपन्न झाल्यानंतर समाज मंदीर या ठीकाणी भाषणांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. नवनाथ मुंडे तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिंदे शिवसेना गटाच्या नांदेड-हिंगोली महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सौ. रत्नमाला मुंडे, जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, संपादक शिवदास मुंडे, ग्रा.प. सदस्य रामेश्वर नागरगोजे, विठ्ठल मुंडे, धनंजय मुंडे, संतोष मुरकुटे, रामराव मुंडे, कालिदास मुरकुटे सह गावातील प्रमुख मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते. या उपस्थित मंडळींचा जयंती कमेटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना अॅड. नवनाथ मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी नांदूरघाट ओपीडीचे जमादार अशोक मेसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड, आरुण कांबळे, गब्बर गायकवाड फौजी, राजेंद्र कांबळे, अभिनव गायकवाड, शिवाजी गायकवाड, चिवळा गायकवाड, संतोष कांबळे, बाळु कांबळे, बापु वाघचौरे, राणू कांबळे, कोंडराम गायकवाड, तूळसीराम वाघमारे, बंडू कांबळे, नवनाथ गायकवाड, धम्मा कांबळे, अर्जुन गायकवाड, नारायण गायकवाड सह कार्यकर्त्यांनी परीश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार महादेव गायकवाड यांनी केले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये