ताज्या घडामोडी

अखेर केजमधल्या उमरी रस्त्याचे उद्घघाटन संपन्न!! हारून भाई इनामदार हेच ठरले उमरी रस्त्याचे जनक!—प्रा.भोसले.

पाठलाग न्युज/केज:

अखेर केजमधल्या उमरी रस्त्याचे उद्घघाटन संपन्न!! हारून भाई इनामदार हेच ठरले उमरी रस्त्याचे जनक!—प्रा.भोसले.

केज/प्रतिनिधी: केज शहराच्या राजकारणाचा विषय ठरलेल्या आणि  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केज शहरातील उमरी रस्त्याचे उद्घाटन आज मंगळवार २मे रोजी केज नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले असून, नेहमीच राजकीय वादाचा विषय ठरलेल्या उमरी रस्त्याच्या निर्मितीउद्घाटनाचे जनक जनविकास आघाडीचे प्रमुख हरुनभाई इनामदार हेच ठरले असल्याची प्रतिक्रिया केज विकास संघर्ष समिती चे अध्यक्ष प्रा.भोसले सरांनी व्यक्त केली आहे  .या बाबत सविस्तर वृत्तांत असा की,केज शहरातील प्रभाग पाच आणि सहा व इतरही उर्वरित प्रभागाला जोडणारा महत्त्वाचा उमरी रस्ता हा मागच्या काही वर्षापासून  दुर्लक्षित राहीला होता.मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वाहने तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा कठीण  झालेले होते.मागच्या अनेक वर्षांपासून सदरील रस्ता करण्यात यावा यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली;.मात्र कित्येक वर्षापासून हा प्रश्न  प्रलंबित होता.परंतु मंगळवारी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड तसेच मुख्याधिकारी महेश गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले,नगरसेवक मुस्तफा खुरेशी, नगरसेवक राजूभाई इनामदार, नगरसेवक भाऊसाहेब गुंड,बाळासाहेब गाढवे,ओम रांजनकर, इनामदार, नगरसेवक पद्मिन शिंदे,नगरसेवक सुग्रीव कराड,नगरसेवक जलाल इनामदार,शेख सादेक,हाजी बॉस,पत्रकार डी.डी.बनसोडे,दत्तात्रय हंडीबाग,दशरथ चवरे,मधुकर शिरसट,तात्या रोडे,व कांही नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सदरील रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.सदरील रस्त्याचे प्रत्यक्ष काम हे येत्या दोन ते तीन दिवसात सुरु करण्यात येईल असे यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ● २२ वर्षाचा प्रश्न हा हारून भाईने सोडवला…* केज शहरात विकासा बाबत आतापर्यंत चा इतिहास आहे,ज्या-ज्या वेळेस हारून भाई इनामदार सत्तेत होते. त्या-त्या वेळेस उमरी रोड च काम झालेले आहे. २०१० साली सत्ता आली त्यावेळी १० लक्ष रुपये टाकून उमरी रोडचा कच्चा रस्ता केला होता. २२ वर्षाचा संघर्षच हा हारून भाईने सोडवला व प्रवेशद्वारापासून ४ ते ५ फुटाचा रस्ता होता ते ३० फुटाचा केला होता. तात्कालीन आमदार ठोंबरे यांच्याकडून दहा लक्ष रुपयेचा निधी घेऊन प्रवेशद्वारापासून काही अंतरापर्यंत सिमेंट रस्ता केला होता.केजच्या उमरी रोडच्या विकासासाठी इतिहासात आतापर्यंत एकमेव जे नाव होते ते म्हणजे हारुन भाई इनामदार.
*●केज शहरात विकास कामाला सुरुवात- शिताताई बनसोड* शहरातील रस्त्याचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्पा हा नगरपंचायतला आलेल्या ९८ लाख रुपयांच्या निधीमधून होईल तर उर्वरित जो रस्ता आहे तो आमदार नमिताताई मुंदडा यांच्या आमदार फंडातून होणार असल्याची माहिती केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनी दिली.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये