क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसंपादकीय
मनोज जारांगे पाटलाचा मेहुणा विलास खेडकर तडीपार;जालना पोलिसांची जबरदस्त कारवाई.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचा जारंगे पाटलांचा दावा.
Pathlag news.



विलास हरिभाऊ खेडकर हा मराठा आरक्षन आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटलांचा मेहुणा आहे.त्याचेवर 1)2021 मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 2)2023 मध्ये गोदावरी नदीतून 4 लाख 81 हजार रुपयांची 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा. 3)2023 साली जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी 307, 353 आणि 435 या कलमान्वये गुन्हा दाखल. 4)2023 रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरी मधून केणी च्या साह्याने 500 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.यामुळे विलास खेडकर याला जालना , छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. सुयोग सोळुंकेवर कोणते गुन्हे? 1)2012-पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीला धमकावून मारहाण तसेच पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याप्रकरणी कलम 307 आणि 353 गुन्हा- 2) 2020-साली दुचाकी ची धडक देऊन मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा. 3)2023 साली -गोदावरीतून 100 ब्रास वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल 4)2025 साली, स्वतःच्या मालकीच्या हायवा मधून वाळू चोरी केल्याचा गुन्हा.गजानन सोळुंकेवर कोणते गुन्हे? 1) 2012 -पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचे प्रकरण, फिर्याद देण्यात आलेल्या साक्षीदाराला मारहाण करून पोलीस स्टेशनची तोडफोड केल्याचा गुन्हा आहे.विविध गुन्हा प्रकरणी आपला मेहुणा विलास खेडकर याला तीन -चार जिल्ह्यातून तडीपार केल्या प्रकरणी मराठा आरक्षण आंदोलक जारंगे पाटलांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे षडयंत्र असल्याचे सांगून मुख्यमंत्री यांचे बाबत एकेरी भाषा वापरली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.