केज: केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. दोन महिन्यांनंतरही याप्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. याप्रकरणाचा तपास व्हावा, आरोपींना शिक्षा व्हावी आणि आपल्या मोठ्या भावाला न्याय मिळावा यासाठी मयत सतोष देशमुख याचे बंधू धनंजय देशमुख हे गेल्या दोन महिन्यांपासून विविध मार्गाने लढत आहेत.सर्व पक्षीय व सर्व समाज प्रेरित अनेक आंदोलने केली, निदर्शने केली, तरी अजूनही या प्रकरणात हवा तसा तपास झालेला नसून, अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याचे मत धनंजय देशमुख यानी व्यक्त केले आहे. तर, ज्याच्यासाठी आपन न्याय मागतोय तो मोठा भाऊ कधीच परत येणार नाही, या विचाराने धनंजय देशमुख हतबल आहेत. तपास सुरु आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय त्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळेपासून आम्हाला आमच्या गावाला धोका आहे. जी घटना घडली ती धमकी वजा इशारा नाही तर त्यांनी ते करुन दाखवलं. त्यासाठी मी पोलिसांकडे विनंती केली आहे. गुन्हा घडल्यानंतरही या गुन्हेगारांना कुठलीही भीती नव्हती. विषेशकरुन घटना घडल्यानंतर साडे दहावाजेपर्यंत या सगळ्या आरोपींचे मोबाईल सुरु होते. आम्ही डिव्हायएसपींना वारंवार विनंती करत होतो. सांगत होतो हे नंबर आहे, यांना कॉल करा, लोकेशन ट्रेस करा, यांनी पकडलं नाही. आमचं आंदोलन यांना फक्त बंद करायचं होतं. सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या चुका केल्या आहेत. नाहीतर यातील कोणीही वाचलं नसतं, सर्वांना अटक झाली असती, असं म्हणत धनंजय देशमुख यांनी यन्त्रना प्रती संताप व्यक्त केला.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.