ताज्या घडामोडी

बीडमध्ये एसीबीचा ‘ धुमधडाका ‘! दहिफळ वडमाऊली येथील तलाठ्यासह एकाच दिवशी दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात मोठी खळबळ.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

बीडमध्ये एसीबीचा ‘ धुमधडाका ‘! दहिफळ वडमाऊली येथील तलाठ्यासह एकाच दिवशी दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात; महसूल विभागात मोठी खळबळ.

पाठलाग न्यूज /प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी एकाच दिवशी केज आणि परळी तालुक्यात दोन वेगवेगळ्या कारवाया करत भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील तलाठी आणि परळी तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथील ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले असून, या ‘डबल कारवाई’मुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ​वारसा हक्कासाठी ३५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्याल लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अलगद जाळ्यात घेतले असून, ​ही मोठी कारवाई केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथे करण्यात आलीआहे.येथील तलाठी परमेश्वर जाधव याने फिर्यादी व्यक्तीकडे वारसा हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल ३९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर हा व्यवहार ३५ हजार रुपयांवर निश्चित झाला होता. ३५ हजारा पैकी ​यातील पहिल्या हप्त्यापोटी ९ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी कार्यालयाबाहेरच सापळा रचून तलाठ्याला रंगेहात बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्यावरच ही कारवाई झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरू आहे.तर, ​दुसरी कारवाई परळी तालुक्यातील गाडी पिंपळगाव येथील ग्रामसेवक ५०० रुपयांच्या लाचेसाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ​एकीकडे तलाठ्यावर कारवाई सुरू असतानाच, एसीबीच्या पथकाने दुसरी कारवाई एका ग्रामसेवकावर केली. केवळ ५०० रुपयांची लाच घेताना या ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम जरी छोटी असली, तरी भ्रष्टाचाराच्या विरोधात एसीबीने दिलेला हा मोठा इशारा मानला जात आहे. ​ही धडाकेबाज कारवाई एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सोपान चित्तमपल्ले, बीडकर, सुरवसे आणि पुरा यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. ​”एकाच दिवशी झालेल्या या दोन कारवायांमुळे लाचखोरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सर्वसामान्यांकडून ‘पाठलाग न्यूज’च्या माध्यमातून एसीबीच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये