कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, आणि आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक न करता सहकार्य करण्याचे आवाहन – नुमान चाऊस
कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, आणि आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक न करता सहकार्य करण्याचे आवाहन – नुमान चाऊस
बीड : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरण व AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कर्ज खाते व बचत खात्याचे पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सेवा केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक न करता त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे आणि विनाकारण त्रास देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील कोणत्याही भागात आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅक नोंदणी किंवा कर्जमाफी प्रक्रियेसंदर्भात अडचण आल्यास शेतकरी बांधवांनी मौलाना आझाद युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. मंचाचे पदाधिकारी त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करतील, असेही नुमान अली चाऊस यांनी सांगितले.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.