ताज्या घडामोडी

विडा परिसरातून महावितरणच्या सव्वा पाच लाखाच्या विद्युत तारेची चोरी ! केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

केज: केज तालुक्यातील विडा सर्कल मधील गप्पेवाडी ते घाटेवाडी रस्त्यावरील नामेवाडी शिवांरातील बाळूमामा मंदिरापासून घाटेवाडी पर्यंतच्या २० विद्युत पोलवरील आल्युनियमची ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी महावितरणचे गुत्तेदार संतोष छंदर मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध केज पोलिसात गुरूवारी गुन्हा नोंद झाला आहे. बुधवारी दि. ४ मार्च सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात आरोपीतानी नामेवाडी, गप्पेवाडी आणि घाटेवाडी शिवारातील २ ते अडीच किमी अंतरातील रस्त्याच्या लगत उभारण्यात आलेल्या २० लोखंडी विद्युत पोलवरील अॅल्युमिनियम लिमिटेड कंपनीची ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी महावितरणचे गुत्तेदार संतोष छदर मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला आसून, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये