नोकरीसाठी जमीन विकून 20 लाख दिले तरीही पूर्ण पगार नाही, आर्थिक विवचनेतील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या.
मराठवाडा: शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात प्रशासकीय अधिकारी व शिक्षण संस्थाचालक यांच्या संगणमताने चालू असलेल्या डोनेशन संस्कृतीच्या आर्थिक नैराश्यातून शिक्षकात्महत्या करत असतानाच बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील धनंजय नागरगोजे या शिक्षकाचे आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील एका शिक्षकांनी संस्था सचिवाच्या आर्थिक जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने पुन्हा शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान संस्था चालकाच्या या डोनेशन संस्कृतीला व आर्थिक छळवणुकीला आळा घालण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन डोनेशन शिक्षण सम्राटांना वेसन घालण्याची मागणी पुढे येत आहे .
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, राज्यात बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच मराठवाड्याच्या परभणीत अशाच बोगस शिक्षक भरतीने एका शिक्षकाचा बळी घेतलाय.श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय शिक्षक सोपान पालवे यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे . एक हृदयद्रावक अशी चिट्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या सुसाईड नोट रुपी चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती शासनाच्या पवित्र पोर्टलला डावलून व नियमांना तिलांजली देत बोगस असल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या चिठ्ठीत संस्थेचे सचिव यांनी भरतीसाठी 20 लाख आणि त्यानंतर 20% वरून 60% टप्पा अनुदानावर नियुक्ती करण्यासाठी 5 लाख रुपये घेतले परंतु तरीही शिक्षक सोपान पालवे यांना काही महिन्याचे वेतन देण्यात आले नाही,तर 60% साठी पैसे देऊनही काही महिन्याचा पगार 20%प्रमाणेच काढला असल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीत केलाय. यामुळे अस्वस्थ झालेल्या व आर्थिक विवंचनेत सापडल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील मंगरूळ येथे नरसिंह प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरसिंह प्राथमिक विद्यालय मंगरूळ येथील सोपान शिवराम पालवे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात संस्थेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. संस्थाचालकाने आर्थिक पिळवणूक केल्याची चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकाने लिहून ठेवली आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील 35 वर्षीय तरुण सोपान पालवे यांनी परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाच्या शेजारी एका झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी ही त्यांनी लिहून ठेवली. ज्यात ज्या शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत तिथले सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्याने त्यांचा कसा छळ केला. याबाबत त्यांनी लिहून ठेवले आहे.भरती करतांना शेत विकून त्यांनी 20 लाख रुपये या सचिवाला दिले .त्यानंतर टप्पा अनुदान वाढवण्यासाठी ही 5 लाखांची मागणी करण्यात आली. बरं एवढे पैसे देऊनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. कधी 20% नि पैसे मिळायचे कधी मिळायचेच नाही, त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीय. यानंतर परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पालवे यांच्या कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.