नांदेड:नांदेड उत्तरचे “शिवसेना” मुख्यमंत्री गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी एका समुहाने फोडल्याची घटना समोर आली आहे. आ.बालाजी कल्याणकर यांच्या कार्यक्षेत्रातील अर्धापूर तालुक्यातील “देवाग- कुराडा” या गावात काही तरुणांच्या समुहाने आमदार कल्याणकर यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे.आ. बालाजी कल्याणकर हे एका लग्न समारंभासाठी “देगाव कुराडा” येथे गेले होते. तिथे ही घटना घडली आहे.बालाजी कल्याणकर यांनी आपली गाडी कार्यक्रम स्थळाजवळचं पार्क केली होती, आणि ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या गाडीवर दगड फेकून त्यांच्या कारची मागची काच फोडण्यात आली. हे कृत्य मराठा आंदोलकांनी केले असावे असे प्रथम समयी बोलले जात आहे. मात्र या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, नेमकं हे कृत्य कुणी आणि कुठल्या कारणांवरून केले? हे अद्याप समोर आलेलं नाही. नांदेड पोलीस या अनाहूत घटणेचा कसून तपास करत आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.