केज पंचायत समितीच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा – गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी कार्यभार स्वीकारला!
केज – मागील एक वर्षापासून केज पंचायत समितीचा कारभार ढिसाळ झाल्याबाबत ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारी सतत होत होत्या. मात्र, कालच नव्याने कार्यभार स्वीकारलेले अनुभवी व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी विठ्ठल दादा नागरगोजे यांच्या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या कामकाजात सुधारणा होणार, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विठ्ठल नागरगोजे हे यापूर्वी केज पंचायत समितीसह विविध ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून काम करताना कार्यक्षमतेचा उत्तम आदर्श निर्माण केल्याचे गौरवले जाते. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळाली होती. त्यामुळे केज तालुक्यातील अपूर्ण असलेली विकासकामे वेगाने मार्गी लागतील, तसेच ग्रामस्थांच्या तक्रारींवर तातडीने तोडगा निघेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी पंचायत समिती केज (BDO) या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारल्या मुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यापक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने दि.०३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष भगवंत (आप्पा) वायबसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जाधव, तालुकाअध्यक्ष आश्रुबा (दादा) खरात, तालुका संघटक नवनाथ सोनवणे, अमोल जगताप, इंगळे, महादेव केदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या कार्यशैलीचे स्वागत करत, “पंचायत समितीचे कामकाज पारदर्शक आणि जनहिताचे होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. कार्यभार स्वीकारताच नागरगोजे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न आणि योजना तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.