केज तालुक्यातील ज्येष्ठ नेते रमाकांत बापू मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
केज /प्रतिनिधी :– केज येथील राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ भाजप नेते तसेच देवगाव येथील माजी सरपंच रमाकांत बापू मुंडे यांचा वाढदिवस उद्या 5 सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा होत आहे. लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य, ग्रामविकासाची धडपड व लोकसंपर्काची अनोखी शैली अवगत केलेले रमाकांत बापू मुंडे यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम करताना गावाच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांसाठी व देवगाव नागरिकांसाठी घेतलेली भूमिका आणि युवकांना राजकारणात व समाजकारणात पुढे येण्यासाठी दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांचा व्यापक जनसंपर्क निर्माण झाला आहे. त्यांची आयुष्यात लक्षवेधी ठरलेली मधुर व गोड वाणी प्रत्येकाच्या स्मरणातच नव्हे तर र्हदयात राहाहील असा हा त्यांचा स्वभाव कोणीही विसरू शकत नाही. अलीकडे नुकताच त्यांनी शिक्षणदान व ज्ञानदान क्षेत्रात प्रवेश करून आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विषयक अभ्यासक्रम चालू केलेला आहे. त्यांचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, कार्यकर्ते व शुभचिंतकांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. आगामी काळातही त्यांना उत्तम आरोग्य लाभो व समाजसेवेची उर्जा लाभत राहो, अशा तमाम हितचिंतकासह पाठलाग परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.