Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीडचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेंच्या काळ्याकुट्ट कर्माची छ. संभाजीनगरात एस आय टी कडून कसून चौकशी! बीड जिल्ह्यातील अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था चालकांचा भ्रष्ट कारभारात समावेश.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

बीडचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेंच्या काळ्याकुट्ट कर्माची छ. संभाजीनगरात एस आय टी कडून कसून चौकशी!

बीड जिल्ह्यातील अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था चालकांचा भ्रष्ट कारभारात समावेश.

छ. संभाजीनगर : शिक्षण संस्थाचालक व शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या शिक्षण विभागात करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्ती घोटाळ्याच्या   स्पेशल चौकशीसाठी राज्य सरकारकडून बिल्ड करण्यात आलेल्या एसआयटीने प्रथमच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यावर आपला  शिकंजा उगारला असून, बीड जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात तक्रारीत असलेल्या अडीचशेच्या वर दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मान्यता व त्यातून जमा केलेली ५०० कोटीं पेक्षा जास्तीची  माया, न्यायालयांची दिशाभूल करून केलेले गैरप्रकार अशा अनेक  आरोपांची प्राथमिक चौकशी व तपास एसआय टी च्या नियंत्रणा खालील स्पेशल समितीमार्फत छत्रपती संभाजी नगरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात करण्यात येत आहे. दरम्यान, सदरची चौकशी कसून चालू असून, बीड जिल्ह्यातील अनेक नामांकित संस्थांचे संस्थाचालक व बोगस नियुक्तींचा आरोप असलेले कर्मचारी तसेच या घोटाळ्यातील दोषी असलेले अधिकारी यांची चौकशी ही तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार क्रमाक्रमाने करून दोषीवरील कार्यवाहीसाठीचा अहवाल तीन महिन्याच्या आत मुख्य एस आय टी कडे सुपूर्द करण्याचे आदेश असल्याने “चौकशीत काहीच होत नसते” अशी भावणा निर्माण झालेले शिक्षणसस्थाचालक, दोशी कर्मचारी व शिक्षण विभागातले अधिकारी यांची पाचावर धारण बसल्याचे चित्र आहे.

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, बीड जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित बेकायदेशीर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणाची चौकशी सध्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज असून, या घोटाळ्यामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तत्कालीन बीडचे शिक्षण अधिकारी ​नागनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात खासगी शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पदाचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी शासनाच्या ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे . या बेकायदेशीर भरतीसोबतच, थकीत वेतनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची रक्कमही गैरव्यवहार करून वितरित केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. ​या गंभीर आरोपांनंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आली आहे. सध्या या पथकामार्फत शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संबंधित शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी बीड जिल्ह्यातील आरोपातील संस्थेला स्पेशल तारीख व वेळ देऊन सुनावणी व चौकशी युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश आहेत. ​ छत्रपती संभाजी नगर खंडपीठानेही या प्रकरणात लक्ष घातले आहे.मा. न्यायालयाने यापूर्वी शासनाला नियमांनुसार पारदर्शकपणे भरती करण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशांचेही तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी उल्लंघन करून हा घोटाळा केल्याचा आरोप असल्याने न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये