बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांचे वतीने सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपन.
पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :
केज :वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून लोक चळवळीच्या माध्यमातून पुन्हा नव्याने समृद्ध पर्यावरणाची निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. ते केज येथील सरस्वती महाविद्यालय केज येथे बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलोयी युनियन औरंगाबाद यांच्या चौदाव्या द्विवार्षिक अधिवेशनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते. तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपण बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व समृद्ध पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आंबा व चिकू या फळझाडांच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. नागेश कराळे यांनी केले. यशस्वीतेसाठी युनियन केजचे फुलचंद सोनवणे, अशोक कोल्हे, अरिहंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.